फेसबुक चे ‘हे’ फीचर्स बंद होणार

150

The गडविश्व
नवी दिल्ली : फेसबुक लवकरच काही फीचर्स बंद करणार आहे. फेसबुकचे नियरबाय फ्रेंड्स फीचर ३१ मे पासून बंद होणार आहे. या फीचरद्वारे लोकांना फेसबुक युजर्ससह आपले सध्याचे लोकेशन शेअर करता येत होते. कंपनीने युजर्सला नियरबाय फ्रेंड्स फीचर आणि इतर लोकेशन बेस्ड फीचर्स बंद होण्याबाबत सूचित केले आहे.
नियरबाय फ्रेंड्स या फीचरसह फेसबुक वेदर अलर्ट, लोकेशन हिस्ट्री आणि बॅकग्राउंड लोकेशनही बंद करणार आहे. ट्विटरवर अनेक युजर पोस्टनुसार, फेसबुकने Facebook App वर एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून फ्रेंड्स नियरबाय फीचर बंद करण्याची घोषणा केली आहे. युजर्सला पाठवण्यात आलेल्या एका नोटिफिकेशनमध्ये कंपनीने सांगितले, की या फीचरद्वारे कोणते फ्रेंड्स तुमच्या जवळपास आहेत, हे सांगणारे नियरबाय फीचर ३१ मे २०२२ पासून उपलब्ध होणार नाही.
वेदर अलर्ट, लोकेशन हिस्ट्री, बॅकग्राउंड लोकेशनसह इतर लोकेशन बेस्ड फंक्शनदेखील फेसबुकवरुन हटवण्यात येणार आहेत. कंपनीने युजर्सला लोकेशन हिस्ट्रीसह आपला डेटा डाउनलोड करण्यासाठी १ ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे. त्यानंतर ते हटवलं जाईल. परंतु फेसबुकने असंही स्पष्ट केलं, की ते इतर अनुभवांसाठी युजर्सच्या लोकेशनची माहिती मिळवणंणे चालूच ठेवेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here