नांगपूर गाव संघटनेचा अवैध दारूविक्री विरोधात सही आंदोलन

98

– नांगपूर गाव संघटनेचा पुढाकार
गडविश्व
The गडचिरोली, २० ऑक्टोबर : कोरची तालुक्यातील नांगपूर येथील गाव संघटनेच्या पुढाकारातून अवैध दारूविक्री विरोधात सही आंदोलन करण्यात आले. या अंतर्गत गावातील ७१ लोकांच्या स्वाक्षरीनिशी पत्र ग्रापं सरपंच, ग्रामसेवक यांना सादर करण्यात आले.
गावातील अवैध दारूविक्रीवर आळा घालण्यासाठी ग्रापं समिती गठीत करण्यात आली. सोबतच अवैध दारूविक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. तशा सूचना दारूविक्रेत्यांना देण्यात आल्या. तरीही चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री करतांना आढळून आलेल्यांवर २५ हजारांचा दंड, दारूविक्रेत्यांची माहिती देणाऱ्यास १००० रुपये बक्षीस व दारू पिणाऱ्याकडून ५०० रुपयांचा दंड आकारण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी गाव संघटना व ग्रापं संघटना प्रयत्नरत आहे. त्याचाच एक भाग म्हणून गावकऱ्यांनी सही आंदोलन केले. सोबतच ७१ ग्रामस्थांनी सही केलेले पत्र ग्रापं प्रशासनाला सादर करून गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here