धानोरा : लेखा गटग्रामपंचायत बिनविरोध

202

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २० ऑक्टोबर : तालुक्यातील लेखा गटग्रामपंचायत मधे सरपंचपदी नंदा दुगा यांची इतर सर्व सदस्य बिनविरोधी निवड करून धानोरा तालुका एक नवा आदर्श ठेवत जुनी साठ वर्षाची परंपरा कायम ठेवलि आहे.
लोकशाहीमध्ये लोकप्रतिनीधीची निवड करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जाते परंतु लेखा ग्रामपंचायतची स्थापना १९६२ पासून आतापर्यंत थेट ग्रामसभा मार्फत बिनविरोध निवडणूक घेण्याची परंपरा अबाधित राखली आहे. यामध्ये सरपंचपदी नंदा दुगा तर उपसरपंच पदी महेंद्र बाजीराव उईके यांची बिनविरोध निवड झाली आहे. सदस्य म्हणून नामदेव मनोज तोफा, ऋषी बिजा शिंदे, योगिता भावेश लंनगुरे , भाविका केवटराम पोरेटी, तारा मोहन दुगा, शारदा देवाजी कोडाप यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
ग्रामपंचायतची निवडणूक ही पक्षाच्या किवा राष्ट्रीय चिन्हवर निवड होत नसल्याने या ठिकाणी कोणत्याही गटाला थारा दिला जात नाही. त्यामुळे गावात राजकीय वाद विवाद मतभेद निर्माण होत नाही. गावात शांतता कायम राहते असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. थेट जनतेतून सरपंच निवडणूक मुळे संपूर्ण गाव भरडून निघत असतो. सर्वच हवसे नवसे उमेदवार सरपंच पदाकरता फार्म भरतात त्यामुळे लायक व्यक्तीची निवडणूक न होता चुकीच्या व्यक्तीची निवड होते .शिवाय पैसा, वेळ, दारू पाणी व इतर वाईट गोष्टीचा वापर होतो. वर्षभर गावात विरोधी वातावरण तयार होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून समाजसेवक देवाजी तोफा, जिल्हा परिषदचे माजी सदस्य विनोद लेंगुरे, ग्रामसभा अध्यक्ष जगदीश राऊत, ग्रामसभा अध्यक्ष अलीराम हीचामी, पोलीस पाटील सुरेश उसेंडी, सदुकर हलामी, प्रशांत कोराम, चिनु दुगा, भजन मडावी, संदीप राऊत, भावेश लेंनगुरे, ग्रामपंचायत सचिव अरुण ढवळे, आशिष उंदीरवाडे, कालिदास सोनुले, सुगंधा तोफा आदी मान्यवर व्यक्ती हजर होते.

#lekha #gathrampanchayat #gadchirolinews #dewajitofa #gadchiroli #dhanora

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here