धनंजय पोटे यांच्या ‘बेवारस’ कादंबरीचे प्रकाशन

226

– गोंडवाना विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य सुनील शेरकी यांच्या हस्ते उदघाटन
The गडविश्व
चंद्रपूर : जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील चेक कोसंबी येथील कवी धनंजय पोटे यांच्या “बेवारस” या कादंबरीचे प्रकाशन स्थानिक पंचायत समितीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृहात १६ ऑगस्ट रोजी पार पडले झाले.
यावेळी अध्यक्षस्थानी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर होते तर प्रकाशन गोंडवाना विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य सुनील शेरकीयांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी झाडीबोलीचे जिल्हा प्रमुख कवी अरुण झगडकर, जिल्हा महिलाध्यक्ष प्राचार्य रत्नमाला भोयर, कवी गंगाधर कुनघाडकर, शिक्षण विस्तार अधिकारी बाबुराव मडावी, कथाकार आनंदराव बावणे यांची उपस्थिती होती.
प्रास्ताविक धनंजय पोटे यांनी केले. पहिल्या सत्राचे संचालन कवी लक्ष्मण खोब्रागडे यांनी तर आभार सुनील पोटे यांनी मानले. दुसऱ्या सत्रात कवी संमेलन झाले. अध्यक्षस्थानी कवयित्री मंजुषा दरवरे होत्या. याप्रसंगी संगीता बांबोळे, शशिकला गावतुरे यांची उपस्थिती होती. कवी संमेलनात योगेश धोडरे, संतोष मेश्राम, वृंदा पगडपल्लीवार, सुरेश गेडाम, प्रशांत भंडारे, सरिता गव्हारे, छाया टिकले, सुजित हुलके, सविता मालेकर, अर्जुमन शेख, प्रीती जगझाप, अर्चना पोटे, सुजित मोहुर्ले, मंदाकिनी चरडे, सुधाकर बामणे यांनी कवितांचे सादरीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here