गडचिरोली जिल्हा पोलीस भरती – २०२२ ची तात्पुरती शारीरीक चाचणी करीता पात्र उमेदवारांची सुची जाहीर

1856

-काही आक्षेप असल्यास नोंदविण्याचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली : जिल्हा पोलीस शिपाई भरती २०२२ च्या १३६ जागांसाठी १९ जून २०२२ रोजी गडचिरोली पोलीस दलामार्फत लेखी परीक्षा घेण्यात आली होती.
सदर भरतीच्या शारीरीक चाचणीची तात्पुरती यादी आता जाहीर करण्यात आली आहे. व काही सूचना ही निर्गमित करण्यात आल्या आहेत.

Gadchiroli police recruitment_provisional physical qualified list

सूचना

• सदर यादी ही शारीरीक चाचणीची तात्पुरती यादी आहे. सदर यादी मध्ये आक्षेप असल्यास तसेच तांत्रिक अडचणीमुळे बदल होऊ शकतो तरी याला अतिंम यादी म्हणून ग्राहय धरण्यात येऊ नये.

• उमेदवाराने त्यांची संपुर्ण माहीती तपासुन (रोल नं, उमेदवाराचे संपुर्ण नाव, लिंग, जन्मदिनांक, शैक्षणिक माहीती, जात, प्रवर्ग, समांतर आरक्षण, पेपर क्र १ चे मार्क ) आक्षेप असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथील समाधान कक्ष दुरध्वनी क्रमांक ८८०६३१२१०० यावर तसेच उपविभागीय कार्यालय / पोस्टे / उपपोस्टे / पॉमके येथे व्यक्तीगत आक्षेप नोंदवु शकता.

• उमेदवार यास आक्षेप असल्यास आक्षेप नोंदवण्याची शेवटची तारीख ०७/०७/२०२२ संध्याकाळी ०६:०० वा. पर्यंत आहे.

ज्या महिलांनी महीलांचे संमातर आरक्षण सोडुन इतर समांतर आरक्षण मध्ये फार्म भरले आहे आणि त्या सामांतर आरक्षण मध्ये जागा उपल्बध असेल तर त्या महिलांना समांतर आरक्षण मध्ये बदल करता येणार नाही.

• उमेदवार यास पुन्हा कळविण्यात येते की गडचिरोली जिल्हयातील रहिवासी यांनाच सदर पोलीस भरतीचा लाभ घेता येइल. शारीरीक चाचणीचे वेळी सर्व कागदपत्र ( जात प्रमाणपत्र, शैक्षणिक कागदपत्र, अधिवास प्रमाणपत्र इत्यादी, इतर) सादर करणे बंधनकारक आहे. तसे न केल्यास उमेदवाराला बाद करण्यात येईल.

• शारीरीक चाचणीची तारीख व वेळ उमेदवारांना नंतर कळविण्यात येईल.

• उमेदवारांनी कुठल्याही प्रलोभन किंवा आमिषाला बळी पडु नये तसेच कोणीही आमिष किवा प्रलोभन देत असेल तर पोलीस अधीक्षक कार्यालय गडचिरोली येथील समाधान कक्ष दुरध्वनी क्रमांक ८८०६३१२१०० यावर तसेच उपविभागीय कार्यालय / पोस्टे / उपपोस्टे / पॉमके येथे माहिती दयावि.

यादी 

Gadchiroli police recruitment_provisional physical qualified list

https://www.gadchirolipolice.gov.in/files/Result/7.pdf

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here