कुरखेड्यात महाराजस्व समाधान शिबिर; शासकीय सेवांचा लाभ, रक्तदानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद

14

कुरखेड्यात महाराजस्व समाधान शिबिर; शासकीय सेवांचा लाभ, रक्तदानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद
The गडविश्व
ता.प्र/ कुरखेडा, दि. १५ : सेवा संकल्प अभियानांतर्गत कुरखेडा तहसील कार्यालयात १४ ऑक्टोबर रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरा’चे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या समन्वयातून नागरिकांना शासकीय सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरालाही नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
उपविभागीय अधिकारी किरण वागस्कर यांच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिराला तहसीलदार शशिकांत जाधव, नायब तहसीलदार वैभव आंबेकर, सत्यनारायण अनमदवार, प्रदीप शिंदे, कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. अमित ठमके आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजिता वाढिवे उपस्थित होते.
या शिबिरात महसूल, कृषी, ग्रामपंचायत, वन व आरोग्य विभागासह महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. विविध विभागांच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने नागरिकांना शासकीय कामांसाठी सुविधा मिळाली. शासकीय सेवा सुलभतेने उपलब्ध करून देणे आणि विविध योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.
दरम्यान, तहसील कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात नागरिकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमाला प्रतिसाद देण्यात आला.
शासकीय सेवा आणि सामाजिक उपक्रमांची सांगड घालणाऱ्या या शिबिरातून नागरिकांना विविध सेवांचा लाभ मिळवून देण्यासोबतच रक्तदानाबाबत लोकसहभागालाही प्रोत्साहन मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here