The गडविश्व
नवी दिल्ली : देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कोरोनाचा हाहा:कार सुरु आहे. विशेष म्हणजे देशभरात थैमान घालणारा कोरोना आता संसद पाठोपाठ सुप्रीम कोर्टातही दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सुप्रीम कोर्टातील तब्बल 150 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच चार न्यायाधीशांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. सुप्रीम कोर्टातील कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव आल्याने त्यांच्यासाठी उद्यापासून हेल्पलाईन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनने दिली आहे.
सुप्रीम कोर्टातील एकूण 32 न्यायाधीशांपैकी 4 न्यायाधीशांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच जवळपास 3000 कर्मचाऱ्यांपैकी 150 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने 2 जानेवारीला कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता 3 जानेवारी पासून दोन आठवड्यांसाठी सर्व सुनावणी डिजीटल पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला होता.