गडचिरोली : आजपासून जिल्ह्यात दिवसा जमावबंदीसह कोरोनाबाबत नवे निर्बंध लागू

414

– सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद
– दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच कार्यालय अथवा दुकांनामध्ये मुभ

The गडविश्व

गडचिरोली : जिल्ह्यात सकाळी 5.00 ते रात्रौ 11.00 वाजेपर्यंत 05 हून अधिक लोकांना जमावबंदी करण्यात आली आहे. रात्रौ 11.00 ते सकाळी 5.00 वाजेपर्यंत वैध कारणाशिवाय बाहेर फिरण्यास मनाई असेल. गडचिरोली सीमा क्षेत्रात जमावबंदी, संचारबंदी व साथरोग संदर्भाने उचित प्रतिबंधात्मक नियमावली आणि उपाययोजना कालावधी 10 जानेवारी, 2022 चे मध्यरात्री 00.00 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत लागू करण्यात आली आहे. कोविड-19 साथरोगसंदर्भाने शासनाचे आदेश, जिल्हा प्रशासनाचे आदेशांमधील अटी, शर्ती, दंडाबाबत निर्देंशाचे काटेकोर पालन करणे सर्व संबंधित व्यक्ती, आस्थापना व शासकीय-निमशासकीय विभागांना बंधनकारक असून अटी व शर्तीचे पालन करणे सक्तीचे असेल.

  • शासकीय कार्यालयात कोणत्याही नागरिकांना संबंधित कार्यालय प्रमुखांचे लेखी परवानगी शिवाय कार्यायालयात प्रवेशास मनाई असेल. प्रमुख कार्यालयांमध्ये नागरिकांशी चर्चेकरिता व्ही.सी.ची सुविधा कार्यान्वित करण्यात येणार आहे. कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेळामध्ये आवश्यक बदल करण्यात येऊन शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम ची सोय उपलब्ध करुन देण्यात यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खाजगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या वेळामध्ये आवश्यक बदल करण्यात येऊन शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम ची सोय उपलब्ध करुन देण्यात यावे. शक्यतो कार्यालयीन वेळा 24 तास करण्यात येऊन कर्मचाऱ्यांचे ड्युटी कालावधीमध्ये तशा प्रकारचे आवश्यक बदल करण्यात यावे, ज्यात त्यांचे प्रवासाचे वेळाचे विचार करण्यात यावे तथापि महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधांनी आवश्यक नियोजन करण्यात यावे असे आदेशात नमुद केले आहे. त्या ठिकाणी कोविड-19 लसीकरणांचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे. तथापि ज्या कर्मचाऱ्यांचे दोन्ही लसीकरण पूर्ण व्हावयाचे आहे त्याकरिता त्यांना प्रोत्साहन देण्यात यावे.
  • विवाह कार्यक्रमात कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून सामाजिक अंतर राखून कमाल एकूण 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल. तथापि याचे उल्लंघन केल्यास रु. 50000/- दंड व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावे. अंत्यविधीसाठी कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून कमाल एकूण 20 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल. सामाजिक/धार्मिक/सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम इ. ठिकाणची गर्दीबाबत कोविड-19 निर्देशाचे अधिन राहून कमाल एकूण 50 लोकांच्या मर्यादेत कार्यक्रम पार पाडण्याची मुभा असेल. तथापि सदर कार्यक्रमांची लेखी परवानगी संबंधित तहसिलदार यांचेकडून लेखी स्वरुपात घेण्यात यावे. तथापि याचे उल्लंघन केल्यास रु. 50000/- दंड व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावे.
  • सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस दिनांक 15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत बंद असतील; तथापि इयत्ता 10 वी व 12 चे शैक्षणिक क्रियाकरिता संबंधित शिक्षण बोर्डाचे वेळोवेळी प्राप्त निर्देशाप्रमाणे शिक्षण विभागाने आवश्यक कार्यवाही करावी. वर्गातील अध्यापनाव्यतिरिक्त प्रशासकीय बाबी व कार्यवाही नियमितपणे शिक्षकांकडून करण्यात यावे. शिक्षण विभाग, तंत्र व उच्चशिक्षण विभाग, कौशल्य विकास विभाग, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालविकास विभागांकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशाप्रमाणे सर्व संबंधित विभागांनी आवश्यक कार्यवाही करावे. याशिवाय सदर विभागांना इतर बाबींकरिता करावयाच्या नियोजनाकरिता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य यांचेकडून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असेल.
  • स्पा, वेलनेस सेंटर्स इ. पुढील आदेशापर्यंत बंद असतील. केसकर्तनालयसह, ब्युटीपार्लर सुरु ठेवता येतील परंतु सदर ठिकाणी 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. दररोज रात्रौ 10 ते सकाळी 7 पर्यंत सदर दुकाने बंद असतील. दुकांनामध्ये केसकर्तनाशिवाय इतर सर्व प्रकारचे कार्यांना मनाई असेल. कोविड अनुरुप वर्तन/निर्देश/नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे. तथापि सदर ठिकाणांमध्ये एसी चा वापर करता येणार नाही.
  • क्रीडा स्पर्धा इत्यादी गाव/शहर/तालुका/जिल्हा स्तरावरील कोणत्याही स्वरुपाचे क्रीडा स्पर्धांना पूर्णत: मनाई असेल.मनोरंजनाची स्थळे जसे की उद्याने, बाग-बगीचे/पार्कस्, किल्ले, प्रेक्षणीय स्थळे इत्यादी पुढील आदेशापर्यंत बंद असतील.
  • शॉपींग मॉल्स, बाजार संकुले सदर ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर मॉल्सचे एकूण क्षमता आणि ग्राहकांची संख्याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्पष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावे. कोविड अनुरुप वर्तन/निर्देश/नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे. सदर ठिकाणी कोविड-19 रॅट चाचणी करिता बुथ/किऑस्क उपलब्ध ठेवण्यात यावे. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मॉल्स व्यवस्थापनाची असेल. दररोज रात्रौ 10 ते सकाळी 8 पर्यंत सदर दुकाने बंद असतील.
  • रेस्टॉरेन्ट, उपहारगृह सदर ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर मॉल्सचे एकूण क्षेमता आणि ग्राहकांची संख्याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्प्ष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावे. कोविड अनुरुप वर्तन/निर्देश/नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मॉल्स व्यवस्थापनाची असेल. दररोज रात्रौ 10 ते सकाळी 8 पर्यंत सदर दुकाने बंद असतील. पार्सल सुविधा/होम डिलीव्हरी सुरु ठेवता येईल.
  • नाट्यगृह/चित्रपटगृहे इ. सदर ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल तथापि सदर मॉल्सचे एकूण क्षेमता आणि ग्राहकांची संख्याबाबत प्रवेशद्वाराजवळ नोटीस बोर्ड सर्वांना स्प्ष्ट दिसेल अशा ठळक पद्धतीने लावण्यात यावे. कोविड अनुरुप वर्तन/निर्देश/नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे. दोन्ही लसीकरण झालेल्या नागरिकांनाच केवळ प्रवेश देण्यात यावे. याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मॉल्स व्यवस्थापनाची असेल.
  • दररोज रात्रौ 10 ते सकाळी 8 पर्यंत सदर दुकाने बंद असतील.
    देशांतर्गत प्रवास महाराष्ट्र राज्यात प्रवेश करतांना दोन्ही लसीकरण पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र वा प्रवासाचे 72 तासादरम्याचे आरटीपीसीआर नकारात्मक अहवाल सोबत असणे गरजेचे आहे. सदर बाब हवाई वाहतूक, रेज्वे वाहतूक, रस्ते वाहतूक ला लागू असेल. रस्ते मार्गांनी प्रवास करणारे वाहनचालक/क्लीनर्स/इतर स्टाफ यांना सदर बाबींचे पूर्ण पालन करावे.
    कार्गो सेवा-वाहतूक, उत्पादन सेवा, बांधकाम कार्ये इ. दोन्ही लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांकरिता सुरु असतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था दोन्ही लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांकरिता नियमितपणे सुरु असतील.
    आठवडी बाजार पुढील आदेशापर्यंत बंद असतील. व्यायामशाळा सदर ठिकाणे 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल. व्यायामशाळांमध्ये कसरती करतांना पूर्णवेळ मास्कचे परिधान करणे बंधनकारक असेल. दोन्ही लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच व्यायामशाळेमध्ये प्रवेश देण्यात यावे तसेच व्यायामशाळाचे कर्मचाऱ्यांचे दोन्ही लसीकरण झालेले असणे अनिवार्य आहे. कोविड अनुरुप वर्तन/निर्देश/नियमांचे पूर्ण बंधन पाळण्यात यावे. तथापि सदर ठिकाणांमध्ये एसी चा वापर करता येणार नाही.

    सदरीलआदेशाचे पालन न करणारी/ उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनीसाथरोग प्रतिबंधक कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तसेच भारतीय दंडसंहिता 1860 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल वनियमानुसार कारवाई करण्यात येईल. दिनांक 9 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशांमधील सविस्तर परिशिष्ट नुसार सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. सर्व आस्थापनांनी सदरील आदेश याची सविस्तर वाचन करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here