सिंदेवाही पोलिसांनी गोवंश तस्करांच्या आवळल्या मुसक्या : ५५ गोवंशांची केली सुटका

271

– वाहनांसह आरोपी ताब्यात
The गडविश्व
सिंदेवाही : स्थानिक पोलिसांनी गडमोशी-कच्चेपार टी पॉईंटजवळ मंगळवारी रात्रोच्या सुमारास नाकेबंदी करून दोन ट्रकमध्ये कोंबून कत्तलीसाठी नेणाऱ्या ५५ गोवंशांची सुटका केली. या कारवाईत कारवाईत २५ लाख ५० हजरांचा मुद्देमाल जप्त करून तिघांना अटक केली आहे. कोंडिबा भोकरे रा. मुखेड जि. नांदेड , मकबुल खान बाबूखान रा.नागलगोंडा जि. आदिलाबाद व मोहम्मद हाजी शेख कासीम शेख रा.नागपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार, सिंदेवाही पोलिसांनी गडमौशी येथे रात्रोच्या सुमारास नाकाबंदी दरम्यान एमएच ३४ बीजी ५६९७ व टीएस २० टी ६३८३ क्रमांकाचे मालवाहू ट्रक ला थांबवून विचारपूस केली असता उडवा उडवीचे उत्तरे दिली. यावेळी ट्रक ची झडती घेतली असता दोन्ही ट्रक मध्ये ३० बैल व २५ गाई कोंबून असल्याचे आढळून आले. दरम्यान पोलीसांनी सदर जनावरांची सुटका करत तळोधी जवळील गोविंदपूर येथील गोरक्षणात सोडून देण्यात आले. दोन्ही ट्रक ताब्यात घेत आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
सदर कारवाई सिंदेवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार घारे यांच्या मार्गदशनात सहा. उपनिरीक्षक गोपीचंद नेरकर, राहुल राहाटे, ज्ञानेश्वर ढोकडे, अरविंद मेश्राम, देवानंद सोनुले यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here