गडचिरोली : पत्नीच्या आत्महत्येची माहिती कळताच सिआरपीएफच्या जवानाने गोळी झाडून केली आत्महत्या

639

The गडचिरोली
गडविश्व : पत्नीच्या आत्महत्येची बातमी कळताचा सिआरपीएफच्या जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास धानोरा येथे घडली. चंद्रभूषण जगत असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, धानोरा येथील पोलीस ठाण्याच्या आवारात सिआरपीएफ ११३ बटालियनचा कॅम्प आहे. या ठिकाणी जवान चंद्रभूषण कार्यरत होते. दरम्यान आज सकाळच्या सुमारास पत्नीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची बातमी चंद्रभूषण यांना माहिती होतात त्यांनी कोणताही विचार न करता स्वत: वर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे कळते. चंद्रभूषण याचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाले होता ते छत्तीसगडच्या बिलासपूर जिल्हयातील कुकुर्दीकेरा येथील रहिवासी असून पत्नी गावी राहत होती. दरम्यान आज पोलीस स्टेशनच्या आवारातच आत्महत्या केल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली. अधिक तपास धानोरा पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here