विद्यार्थिनींनी जाणून घेतली कृषी उत्पन्न बाजार समितीची कार्यप्रणाली

206

The गडविश्व
गडचिरोली, १२ जुलै : स्थानिक कृषी महाविद्यालय व कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थिनींनी गडचिरोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन कार्यप्रणाली जाणून घेतली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष राकडे यांनी समितीचे सदस्य, धान खरेदी व विक्रीसाठी असलेला मुख्य मार्केट, गोडाऊन, शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना व परवाना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. अशाप्रकारे विद्यार्थिनींनी कृषी उत्पन्न बाजार समितीची कार्यप्रणाली व व्यवस्थापन जाणून घेतले. हा उपक्रम विद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश कडू, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. कऱ्हाडे, उपक्रम अधिकारी डॉ. प्रवीण महातळे, मार्गदर्शक नरेश बुद्धेवार, विषयतज्ञ डॉ. शुभांगी अलेक्झांडर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या उपक्रमात कृषी विद्यार्थिनी दिव्या अतकरी, धनश्री प्रधान, योगिनी वरकडे व ज्ञानेश्वरी बडगे सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here