रशिया-युक्रेन युद्ध : १३७ लोकांचा बळी, शेकडो जखमी

166

The गडविश्व
युक्रेन : युक्रेन आणि रशियामधील युद्धाची परिस्थिती चिघळत चालली आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादमीर झेलेन्स्की यांनी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात आतापर्यंत 10 लष्करी अधिकाऱ्यांसह 137 नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर तर शेकडो लोक जखमी झाल्याचंही समजते . मृतांमध्ये रशियन लोकांनी ताब्यात घेतलेल्या ओडेसा प्रदेशातील झमीनी बेटावरील सर्व सीमा रक्षकांचा समावेश आहे. रशियाशी लढण्यासाठी युक्रेन एकाकी पडल्याचेराष्ट्राध्यक्ष जेलेन्स्की यांनी म्हटले आहे.
रशियन सैन्याने चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर ताबा मिळवला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा रशियन सैन्याने ताबा घेतला तेव्हा चेर्नोबिल प्लांटमधील कर्मचार्‍यांना ओलिस ठेवण्यात आले होते. या हालचालींना अमेरिकेने चिंताजनक म्हटले आहे. अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, राजधानी कीव आणि इतर प्रमुख शहरे ताब्यात घेण्याचा आणि शेवटी अधिक अनुकूल सरकार स्थापन करण्याचा रशियाचा हेतू असू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here