महा ई सेवा केंद्राचा सर्वर कासवगतीने : कामे खोळंबली

599

– शैक्षणिक विद्यार्थ्यांची कागदपत्रांसाठी धावपळ

The गडविश्व
गडचिरोली, ६ जुलै : नागरिकांना सर्वच प्रकारचे दस्ताऐवज उपलब्ध करून देण्याच्या हेतूने महा ई सेवा केंद्र निर्माण करण्यात आले. मात्र, महा ई सेवा केंद्राचा सर्वर मागील काही दिवसांपासून कासवगतीने चालत असल्याने अनेकांची कामे खोळंबली आहेत. विशेष म्हणजे, शैक्षणिक सत्र सुरू झाल्याने शालेय विद्यार्थ्यांची विविध कागदपत्रांसाठी तसेच शेतकऱ्यांना कागदपत्रांसाठी महा ई सेवा केंद्राकडे धाव घ्यावी लागत आहे. मात्र, संबंधित केंद्रामध्ये कोणतेही ऑनलाईन कामकाज होत नसल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राज्य शासनाव्दारे महा ई सेवा केंद्राच्या माध्यमातून विविध प्रकारची प्रमाणपत्रे, परवाणे, अनुज्ञप्ती आणि इतर सेवा प्रदान केल्या जात आहेत. केंद्रचालक नागरिकांना आवश्यक असणाऱ्या सेवेचा अर्ज ऑनलाईन भरून देतो व नागरिक आवश्यक त्या सेवा कोणत्याही अडथळयाशिवाय प्राप्त करू शकतात. ७/१२ उतारा, रहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र अशी अनेक उपयुक्त कागदपत्रे या महा ई सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिक प्राप्त करीत आहेत. यासाठी रांगेत लागायची व कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज नाही. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेची बचत करणारी आहे. मात्र, मागील १० ते १२ दिवसांपासून महा ई सेवा केंद्राचा सर्वर कासवगतीने चालत असल्याने कामे प्रभावित होत असल्याची माहिती केंद्रचालकाच्या वतीने प्राप्त झाली आहे. सर्वमधील तांत्रीक अडचणी दूर करून सेवा पुर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी केंद्रचालक तसेच नागकरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here