नक्षल्यांनी केली तिघांची हत्या : मृतकांमध्ये एक महिला व दोन पुरूषांचा समावेश

1434

– नक्षल्यांकडून हत्यासत्र सुरूच

 

THE गडविश्व

 

बीजापूर : छत्तीसगडमध्ये नक्षल्यांकडून हत्यासत्र सुरूच असून काल पुन्हा बीजापूर येथील गंगालूर पोलीस ठाणे क्षेत्रात नक्षल्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशायावरून एका महिलेसह दोन पुरूषांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, बीजापूरच्या गंगालून पोलीस ठाणे क्षेत्रातील इडिनार येथे नक्षल्यांनी ग्रामस्थांची बैठक घेऊन एका महिलेसह दोन पुरूषावर खबरी असल्याचा आरोप लावत निघृन हत्या केली.  मृताकामध्याये कमलु पुनेम, महिला मंगी सह एका पुरुषाचा समवेश आहे. घटनेबाबत माहिती मिळाली असून घटनेसंबधी सर्व माहिती गोळा करणे सुरू आहे असे बीजापूरच्या पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे. सदर घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here