जहाल नक्षली नर्मदाक्काचा मुंबईत मृत्यू : नक्षल्यांनी दिली उद्या दंडकारण्य बंद ची हाक

866

The गडविश्व
गडचिरोली : नक्षल्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी सचिवालयाची सदस्या नर्मदाक्का हिचे मुंबई येथील एका रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याचे वृत्त आहे तिच्या निधनाप्रित्यर्थ नक्षल्यांनी उद्या २५ एप्रिल रोजी दंडकारण्यात बंदचे आवाहन केले आहे. दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचा सचिव विकल्प याने एक पत्रक जारी करून या बंदची माहिती दिली.
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात गेल्या दहा-पंधरा वर्षात आपल्या हिंसक कारवायांनी दहशत माजवणाऱ्या जहाल नक्षली नर्मदाक्का ला जून २०१९ मध्ये गडचिरोली पोलिसांनी तिचा पती किरण कुमार सह सिरोंचा येथून अटक केली होती. त्यानंतर तिला मुंबईतील एका कारागृहात ठेवण्यात आले होते. मागील अनेक वर्षापासून तिची प्रकृती बरी नव्हती. तिची प्रकृती खालावल्याने तिला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान रुग्णालयात उपचार सुरू असताना ९ एप्रिल रोजी नर्मदाक्का चा मृत्यू झाल्याचे कळते. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागात तिने मोठी दहशत माजवली होती. तिने आपल्या नक्षल चळवळीच्या कार्यकाळात अनेक हिंसक, जाळपोळीच्या कारवाया घडवून आणल्या होत्या. तिच्या निधनाप्रित्यर्थ नक्षल्यांनी उद्या २५ एप्रिल रोजी दंडकारण्यात बंदचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here