खळबळजनक : नक्षल्यांनी तीन ट्रकची केली जाळपोळ

535

– लाकडांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची जाळपोळ, लाखोंचे नुकसान
The गडविश्व
नारायणपूर : जिल्ह्यात पुन्हा एकदा नक्षल्यांनी धुमाकूळ घातला आहे. नक्षल्यांनी जंगलातून लाकूड वाहतूक करण्याच्या कामात गुंतलेल्या 3 ट्रकची जाळपोळ केल्याची घटना काल शुक्रवार ला सायंकाळच्या सुमारास घडली. नारायणपूरचे पोलीस अधीक्षक गिरिजा शंकर जयस्वाल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. सदर घटना जिल्ह्यातील धानोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याचे बोलल्या जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, नारायणपूर-ओर्छा मार्गावरील राजपूर गावापासून अवघ्या ५ किमी अंतरावर असलेल्या हिरंगाई झारा खोऱ्यात नक्षल्यांनी सदर ट्रकची जाळपोळ केली. नक्षल्यांनी चालकांना ट्रक मधून उतरवून ट्रकची डिझेल टाकी फोडून तीन ट्रक पेटवून दिले.
जाळपोळ करण्यात आलेले ट्रक हे जगदलपूर येथील राजेश श्रीवास्तवचे असल्याचे सांगण्यात येत आहे.सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here