भंडारा : विजेच्या धक्क्याने पट्टेदार वाघाचा मृत्यू

347

The गडविश्व
भंडार : जिल्ह्यातील कोका जंगल परिसरात रुद्र नावाच्या तरुण, रुबाबदार पट्टेदार वाघाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे वनविभागाच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
शेतकऱ्याने जंगली जनावरांच्या रक्षणासाठी कुंपणात वीज प्रवाह सोडला होता त्या विजेजा शॉक लागल्याने वाघाचा मृत्यू झाला. भंडारा शहरापासून अवघ्या 6 किलोमीटर अंतरावर पलाडी गावाच्या शेतशिवारात काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास हा मृतदेह गावकऱ्यांना दिसला. सततच्या प्रवासाच्या हालचालीमुळे जय प्रमाणे रुद्र देखील हा पर्यटकांच्या आकर्षणानाचा केंद्र होता.
मृत वाघ हा रावणवाडी, धारगाव या जंगलात फिरणारा B2 उर्फ रुद्र नावाने ओळखला जाणारा तरुण वाघ होता. जवळापास 5 वर्ष इतके वय असलेला रुद्र अंदाजे 200 किलोचा एक रुबाबदार वाघ होता. रुद्रवर लक्ष ठेवणाऱ्या सामाजिक संस्थेने दिलेल्या माहितीनुसार तो काल शुक्रवारी पहिल्यांदाच या क्षेत्रात आला होता. ज्या ठिकाणी रुद्र याचा मृतदेह आढळून आला त्याठिकाणी तब्बल 1100 वॅटचा विद्युत प्रवाह जात आहे. शेजारीच एक नाला तसेच शेतकऱ्यांची शेत देखील आहेत. या परिसरातील शेतकरी दररोज त्यांच्या शेतावर येतात. मात्र रुद्र कधीच त्यांना दर्शन झाले नव्हतेतं. पण काल प्रथमच रुद्र या क्षेत्रात आला आणि त्याला त्याचा जीव गमवावा लागला.
ज्या शेतकऱ्याच्या शेतात हा मृतदेह आढळला त्याने भंडारा वनविभागाला त्याची सूचना दिली. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच पोलीस विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले. घटनेची माहिती परिसरात पसरल्याने नागरिकांनी वाघ पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती या परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल नसले तरी रानडुक्कर आणि इतर छोटे प्राणी यांची शिकार करण्यासाठी शिकारी अशाप्रकारच्या विद्युत तारा लावून ठेवतात. अशाच तारांना स्पर्श होऊन या वाघाचा मृत्यू झाला असल्याचा खात्रीदायक खुलासा भंडारा मानद वन्य जीव रक्षक यांनी केला आहे. हा वाघ या परिसरातील शान होता पण त्याच्या अशा अकाली मृत्यूमुळे भंडारा जिल्ह्याचा आणि वन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here