आर्यन खान ड्रग्स प्रकरणात गौप्यस्फोट करणारे पंच प्रभाकर साईलचा मृत्यू

487
File Photo

The गडविश्व
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे गेल्या वर्षी सर्वत्र खळबळ उडाली होती. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात गौप्यस्फोट करणारे एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांचा काल शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रभाकर साईल यांचे निधन झाल्याची माहिती वकील तुषार खंदारे यांनी दिली आहे.
चेंबूर येथील माहुल भागातील राहत्या घरी प्रभाकर साईल यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. आज सकाळी ११ वाजता प्रभाकर साईल यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी अंधेरी येथील त्यांच्या घरी आणले जाणारा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here