आरमोरी : शहरात भरदिवसा चोरी करणाऱ्या आरोपींच्या तीन दिवसांत आवळल्या मुसक्या

153

महाराष्ट्र विधानपरिषद थेट प्रक्षेपण (अर्थसंकल्पीय अधिवेशन, फेब्रुवारी-मार्च २०२३)

– आरमोरी पोलिसांची यशस्वी कामगिरी
The गडविश्व
ता.प्र / आरमोरी (नरेश ढोरे) २० ऑक्टोबर : शहरात १२ ऑक्टोबर रोजी भरदिवसा घरावर दरोडा टाकून सोने व रोख रक्कम चोरी केल्याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी तीन दिवसात या प्रकरणाचा छडा लावत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
अस्सलम अजुम उल्हा शाहा, शाहीद अल्ली हमीद अल्ली शाहा दोन्ही मु.उत्तरप्रदेश असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आरमोरी शहरात वास्तव्यास असलेले दांम्पत्य दोघेही नौकरी वर असल्याने वेळेवर आपापल्या ठीकाणी रुजू झाले असता .१२ आक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता भरदिवसा चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजा तोडुन घरातील आलमारीतील ३०. ग्राम सोने व २२ हजार रुपये रोख
लंपास करुन फरार झाले होते. सदर प्रकरणाची चौकशी करून अपराध क्र.४१६/२०२२ कलम३१६ -४६४ भा.दं. वी.अन्वये गुन्हा नोंद करून पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, अपर पोलीस अधीक्षक सोमय मूंडे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्राणिल गिल्डा, पोलीस निरिक्षक मनोज काळबांडे व महीला उपनिरीक्षक भाग्यश्री शिंदे यांनी तपासाचे चक्र फीरवुन अवघ्या तीन दिवसांत आरोपींचा छडा लावला. यातील आरोपीना अटक करून न्यायालयात हजर केले असता १७ ते २० ऑक्टोबर २०२२ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.व आरोपी कडुन ४३ हजार रुपयांचा मुद्देमाल व २ हजार रुपये रोख जप्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here