अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभागाद्वारा जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सत्कार

304

The गडविश्व
नागपूर : जागतिक महिला दिनानिमित्त अनेक कार्यालय, महाविद्यलयात महिला दिन साजरी करण्यात येतो. त्याचप्रमाणे जागतिक महिला दिनानिमित्त अपर आयुक्त,आदिवासी विकास विभाग,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,नागपूर व अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय,नागपूर येथील कार्यरत सर्व महिला अधिकारी व कर्मचारी यांना अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नागपूर विभागाद्वारा पुष्पगुच्छ व पेढे देऊन सन्मान करण्यात आला. तसेच आदिवासी जनतेच्या हिताच्या कार्यासाठी आभार व्यक्त करण्यात आले.
याप्रसंगी संघटनेचे दिनेश शेराम, विजय परतिके, स्वप्नील मसराम, सुरेंद्र नैताम, राहुल मडावी, रोशन यादव, संतोष आत्राम, अमन बोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here