जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांच्या प्रयत्नाला यश ; राष्ट्रीय मार्गावरील शेतीची नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार मोबदला

184

– जिल्हाधिकारी यांनी निवेदनाची दाखल घेत सुरु केला पंचनामा
The गडविश्व
गडचिरोली, १४ डिसेंबर : आष्टी- आलापल्ली या राष्ट्रीय मार्गावरील शेतीचे वाहनाच्या धुळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोबदला मिळणार असून जि.प.माजी अध्यक्ष कंकडालवार यांच्या प्रयत्नाला यश आले. जिल्हाधिकारी यांनी जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या निवेदनाची दाखल घेत शेतीच्या नुकसानीच पंचनामा सुरु केला आहे.
आष्टी ते आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग क्र.३५३ या तलाठी कार्यालय साजा क्र.९ मधील बोरी, राजपूर प्याच, शिवनीपाठ या गावातील शेतकरी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी शेती करत आहेत. मात्र गेल्या वर्षापासून सूरजागड येथील लोहखनिज उत्खनन करून दररोज हज़ारों ट्रक ये-जा करत असल्याने मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतीवर पूर्णत धूळ पसरत असल्याने शेतातील उभे पिक कापूस,धान पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत. तरी शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची मोका पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री अजयभाऊ कंकडालवार यांनी जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देवून मागणी केली होती त्यानुसार महसूस विभाग व कृषि विभाग कडून सर्वे केले होते मात्र मोबदला मिळाले नसून धातुर-मातूर सर्वे करण्यात आली आहे होती. त्यामुळे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अजय कंकडालवार सह शेतकऱ्यांनी तहसीलदार यांना पुन्हा निवेदन दिले व १२ डिसेंबर २०२२ पर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांचे सर्वे करून योग्य मोबदला देण्यात यावा अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. या निवेदनाची दखल घेत तहसीलदार व जिल्हाधिकारी यांनी मोबदला देण्याची जाहीर केले असून जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आहे.

(The Gadvishva ) (Z .P. Ex-President Kankdalwar’s efforts succeeded) (France vs Morocco) (Vijay Sethupathi) (Meteor shower) (Arsenal vs Milan) (Ashti-Alapalli National Highway)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here