अहेरी शहरातून जाणाऱ्या जड वाहनांची वाहतूक बंद करा : जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार

432

– अन्यथा अहेरी चक्काजमा आंदोलन करण्याचा इशारा
The गडविश्व
अहेरी, १४ डिसेंबर : एटापली तालुक्यातील सूरजागड येथून लोहखनिज घेवुन जाणारे जड वाहन तसेच तेलंगणा राज्यातून क्रेसर गिटटी घेवुन अहेरी -आलापली मार्गी जड वाहन जात असून अहेरी येथील दक्षिण हनुमान मंदिर ते परिवहन मंडळ (बस स्टॉप) पर्यंत दोन्ही बाजूंनी घरे व लहान-मोठे दुकाने असून या जड वाहनामुळे लोहायूक्त दूर पसरत आहे. त्यामुळे अहेरी शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना नाहक त्रास करवा लागत आहे. त्यामूळे सदर रस्त्यांवरील जड वाहनांची वाहतूक बंद करावी अन्यथा चक्काजमा आंदोलन करण्यात येईल असे इशारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिली आहे.
सूरजागड येथून लोहखनिज भरून जड वाहन अहेरी मार्गे जाते तसेच तेलंगणा राज्यातून क्रेसर गिटटी अहेरी उपविभागांमध्ये आणले जात आहे त्यामूळे सदर रस्ता वाहतुकीस या मार्गावरून रहदरी करण्यास प्रवेश बंदी असते, मात्र जड वाहन सुरू असल्याने खड्डे पडून रस्ता खराब होत आहे, तसेच नागरिकांना त्रास होत आहे त्यामूळे सदर रस्त्यावरून जड वाहन बंद करावे असे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी संबंधित विभागाचे अधिकारी कर्मचारी यांना त्वरित सदर मार्ग जड वाहतुकीस बंद करण्याच्या निर्देश देण्यात यावे अन्यथा चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असे इशारा देण्यात आला आहे.

(The Gadvishva ) ( Stop vehicular traffic to heavy vehicles passing through Aheri town Z.P. Ex-President Kankdalwar’s efforts succeeded) (France vs Morocco) (Vijay Sethupathi) (Meteor shower) (Arsenal vs Milan) (Aheri)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here