The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ९ ऑगस्ट : येथे आज ९ ऑगस्ट २०२३ रोजी तालुकास्तरीय जागतीक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिवासी देवी देवतांची विधिवत पूजा करून सप्तरंगी झेंड्याचे ध्वजारोहण दौलतशहा जमीनदार यांच्या हस्ते करण्यात आले. धानोरा शहराच्या मुख्य रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये ढोल व माजरीच्या वाजासह गाजत रॅली काढण्यात आली तसेच मणिपूर घटनांचे निषेध नोंदविण्यात आला. या रॅलीमध्ये तालुक्यातील बहुसंख्य आदिवासी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी हिरामण वरखडे माजी आमदार होते तर उद्घाटक म्हणून मडावी इलाका भूमी धानोरा, प्रमुख अतिथी देवाजी तोफा समाजसेवक मेंढा, मनोहर पाटील पोरेटी माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद गडचिरोली, नाजूकराव तोफा, जीवन नरोटे गाव पुजारी आणि धानोरा तालुक्यातील लोक बहुसंख्येने आदिवासी समाज उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना कृष्णा भुरकूया यांनी, संचालन एल. एम.उसेडी तर आभार गणेश हलामी यांनी मांनले.