राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरमोरी तालुका अध्यक्षपदी अमीनभाई लालानी तर कार्याध्यक्षपदी सुनील नंदनवार यांची नियुक्ती

241

The गडविश्व
ता.प्र / आरमोरी, ९ ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र वासेकर यांनी आरमोरी तालुका राष्ट्रवादी काँगेस पार्टीच्या तालुका अध्यक्षपदी आरमोरी येथील सक्रिय ज्येष्ठ कार्यकर्ते अमिनभाई लालानी यांची तर तालुका कार्याध्यक्ष पदी सक्रिय कार्यकर्ते सुनील नंदनवार यांची नियुक्ती केली आहे.
अमिनभाई लालानी आणि सुनील नंदनवार यांनी आपल्या नियुक्तीचे श्रेय राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम, माजी आमदार हरिरामजी वरखडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, माजी कृषी सभापती नानाभाऊ नाकाडे, प्रदेश सरचिटणीस प्रा. ऋषिकांत पापडकर यांना दिले आहे.
नवनियुक्त तालुका अध्यक्ष अमिनभाई लालानी व नवनियुक्त तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार यांच्या नियुक्तीबद्दल प्रदेश संघटक युनूस शेख, युवक जिल्हा अध्यक्ष लिलाधर भरडकर, जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, जिल्हा सचिव कपिल बागडे, फहिमभाई काझी, दिलीप मोटवानी, नगरसेवक माणिक भोयर, प्रदीप हजारे, दिवाकर गराडे, राजू आकरे, सुरेंद्र बावनकर, दिपक बैस, अनिल आलबनकर, गणेश मंगरे, देवानंद बोरकर, रामकृष्ण प्रधान, माजी सरपंच ओमप्रकाश जवंजालकर, धुरंधर सातपुते, टीकाराम बोरकर, देवेंद्र सोनकुसरे, योगाजी थोराक, रवी दुमाने, प्रफुल राचमलवार, नरेश ढोरे, ज्योती सोनकुसरे, वासाळा ग्राम पंचयत उपसरपंचा उज्वला मंगरे, शर्मिला मसराम, अस्मिता मेश्राम, नीलिमा मेश्राम, ज्योती घाटूरकर, हसीना ठवरे, जयश्री निकुरे इत्यादी पदाधिकरी व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here