मुनघाटे महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात

23

मुनघाटे महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन उत्साहात
– लोकसंख्या नियंत्रण हे राष्ट्रीय कर्तव्य
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि.११ : दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था, गडचिरोली संचालित गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन विविध जनजागृतीपर उपक्रमांनी साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या लोकसंख्या शिक्षण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले.
कार्यक्रमात डॉ. दीपक बनसोड आणि प्रा. तृप्ता वाकडे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना संबोधित केले. लोकसंख्या ही देशाची महत्त्वाची साधनसंपत्ती असून तिचे योग्य नियोजन आणि नियंत्रण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. लोकसंख्या नियंत्रणात युवकांची भूमिका महत्त्वाची असून जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाने राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन लोकसंख्या शिक्षण विभागाचे समन्वयक डॉ. गणेश सातपुते यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. आडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here