शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन पासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करणार का ?

402
डिमांड पावती दाखवतांना शेतकरी

– शेतकऱ्यांचा प्रश्न
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.१९ : तालुक्यातील शेतकऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी शेतात वीज कनेक्शन जोडुन घेण्यासाठी विज महावितरण कंपनी धानोरा येथे रीतसर अर्ज करून मीटरसाठी डिमांड भरले परंतु महावितरण कडून शेतकऱ्यांना विज कनेक्शन पासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर सरकार कारवाई करनार का? असा प्रश्न तालुक्यातील शेतकरी विचारीत आहे.
धानोरा तालुक्यातील डोंगराळ अतिदुर्गम भागात सिंचनाची सुविधा नाही. अशातच शेतकऱ्यांनी स्वतःची शेती ओलीत करण्यासाठी शासनाच्या योजनेतून विहिरीचे बांधकाम केले. पण पिकाला पाणी देण्यासाठी विद्युत पुरवठा नसल्याने शेतात विहीर असुनही निसर्गाच्या लहरी पाण्यावर अवलंबून शेतकरी अवलंबून आहे. त्यामुळे गरजे नुसार आवश्यक आणि हमखास उत्पन्न घेता येत नाही.
धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीसाठी आवश्यक असलेल्या मीटर न मिळाल्याने विज कनेक्शन उपलब्ध न झाल्याने धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना रब्बी पिके, दुबार पीक व भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यापासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील शेतकरी रामदास धानु मडावी या शेतकऱ्यानी १ एप्रिल २०२१ ला ११६८५/- रुपये, शंकर देवाजी नैताम यांनी ११६९७/- रुपये, शितकुश झिंगूजी कोकोडे यांनी ११३९३ रुपये, साईनाथ ऋषीजी गुरनुले यांनी ११६८५/- रुपये, रवींद्र नथुजी कोसरे यांनी ११६८५/ रुपये डिमांड भरले, मोतीराम हलामी, नवडूजी उईके या शेतकऱ्यांनी सुद्धा डिमांड भरले पण आजतागायत शेतकऱ्यांना वीज मीटर अजून पर्यंत देण्यात आले नाही. त्यामुळे शेतकऱ्या आपल्या शेतातून भाजीपाला लागवडीसाठी पाण्याची गरज असते. तसेच रब्बी हंगामात मका,गहु, हरभरा भाजीपाला लागवड करुण वेळेवर पाणी उपलब्ध होत नाही. अशामुळे शेतकऱ्याचे पीक करपू लागते. तसेच आर्थिक उन्नती सुद्धा होत नाही. धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना २ वर्षापासून वीज कनेक्शन उपलब्ध होत नसल्याने तालुक्यातील शेतकरी नाराज आहेत. वेळीच विद्युत पुरवठा मिळत नसेल तर शेतकऱ्यांनी काय करावे ? शेतात दुबार पीक व भाजीपाला घेऊन आपली आर्थिक प्रगती करू नये का असा सवाल शेतकरी विचारत आहेत. तसेच महावितरण विरुद्ध शेतकरी रोष व्यक्त करीत आहे. अशा परिस्थितीत एखाद्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर याला जिम्मेदार कोण राहील? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन पासून वंचित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर महावितरण कारवाई करून शेतकऱ्याच्या शेतावर लवकर वीज जोडणी करून द्यावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here