
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.१९ : शासन स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत संगणक चालक महत्वाची भूमिका बजावित आले आहे. मात्र सदर कर्मचाऱ्यांची अल्पशः मानधनावर मागील १२ वर्षापासून बोळवण सुरु आहे. त्यातच कामाचा बोझा वाढविण्यात आल्याने सदर कर्मचारी त्रस्त आहेत. त्यामुळे मानधन वाढीसह विविध मागण्यांना घेऊन संगणक चालकांनी १७ नोव्हेंबरपासून कामबंद आंदोलन पुकारले असल्याने धानोरा तालुक्यातील आपले सरकार केंद्राचे काम ठप्प पडले आहे.
ग्राम विकास विभागांतर्गत मागील १२ वर्षांपासून आपले सरकार केंद्र प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत ग्रा.पं स्तरावर संगणक चालक या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर कर्मचारी 6 हजार ९३० या अल्पशा मानधनावर मागील अनेक वर्षापासून काम करीत आहेत. सदर संगणक चालकांना कर्मचारीचा दर्जा देऊन किमान वेतन देण्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने समिती गठित केली होती. या समितीने २०१८ मध्ये
संगणक चालकांना ग्रामपंचायतीच्या सुधारीत आकृतीबंधानुसार पद निर्मितीची शिफारस केली होती. यासंदर्भात अनेकदा शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. या पाठपुराव्याअंती ११ जानेवारी २०२३ रोजी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पद निर्मितीसह किमान वेतन देण्यास मंजूरी प्रदान करण्यात आली. मात्र अनेक महिन्याचा कालावधी लोटूनही शासनाने
ग्रा. पं. संगणक चालकांच्या कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
संगणक चालकांच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष केले असल्याने संगणक चालक संताप व्यक्त करीत कामबंद आंदोलन पुकारले आहे. आंदोलनात धानोरा तालुक्याती तालुका अध्यक्ष उमेश वासनिक, सचिव शिवाजी कटकेलवर, नितीन कावळे, संदीप वातगुरे, योगिता भैसारे, राकेश सहारे, सुनील गावंडे,भोलेनाथ कावळे, संगणक चालक सहभागी झाले आहेत. त्याचे निवेदन धानोरा चे विस्तार अधिकारी बि. आत्राम यांना धानोरा तालुका संघटनेच्या वतीने देण्यात आले.
यात संगणक चालकांना किमान वेतन लागू करवा, किमान वेतन मिळेपर्यंत २० हजार रुपये मानधन देण्यात यावे, पेसा अंतर्गत जुन्या संगणक चालकांना नियुक्त करुन त्यांचे ७ महिन्यांचे थकित मानधन त्वरीत देण्यात यावे, या मागण्यांचा समावेश आहे.

