आरमोरीत अवैध सट्टा पट्टीला उत : पोलीस प्रशासन शांत का ?

540

– राजरोसपणे चालतो सट्टा
The गडविश्व
चेतन गहाणे / आरमोरी, दि. ३० : गडचिरोली जिल्हयात अवैध धंदयांना उत आले असुन पोलीस प्रशासनही त्यावर अंकुश लावण्यात काही प्रमाणात मागे पडत आहेत. आरमोरी शहरात अवैध रित्या राजरोसपणे सट्टा चालत असल्याची माहिती आहे. मात्र असे असतांना पोलीस प्रशासन शांत का ? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस अधिक्षकांनी अवैध धंदयांवर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हयातील सर्वच पोलीस स्टेशन, उपपोलीस स्टेशन यांना दिले आहे. आरमोरी शहर हे अवैध तंबाखू विक्री, दारू विक्री, सट्टा पट्टी, कोंबडे बाजारचे हब झाले आहे. आरमोरी शहर जिल्हा मुख्यालयापासुन सुमारे ३४ किमी अंतरावर आहे. आरमोरी शहरात दारू विक्री, तालुक्यातील कोंबडा बाजार, सट्टा पट्टी अशा अवैध धंद्यांना उत आले आहे. शहरातील दुर्गा मंदिर परिसर, पंचायत समिती परिसर, नेहरू चौक काळागोटा परिसरात मोठया प्रमाणात सट्टा चालत असल्याच्या खमंग चर्चा असून याच्या आहारी अनेकजण जात असल्याने त्याचा परिणाम युवा वर्गावरही होताना दिसत आहे. अनेक युवक वर्गही या सट्टा च्या आहारी जात असल्याचे दिसून येत असून जिकडे तिकडे सट्टाच्या आकड्याची चर्चाही दिसून येत आहे. शहरात सट्टा चालवणारा सट्टा चालक हा त्या परिसरातील ‘सट्टा किंग’ म्हणून ओळखल्या जातो असे कळते. त्यावर कोणीही कारवाई करू शकत नाही असे तो छातीठोकपणे सांगतो असे कळते त्यामुळे या सट्टा किंग ला पाठबळ कोणाचे ? सट्टा किंग कोण ? खुलेआम चालणाऱ्या सट्टावर कारवाई न करता पोलीस प्रशासन शांत का ? असा देखील सूर नागरीकातून उमटताना दिसत आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli news updates, armori, police, crime news, gadchiroli, chamorshi, wadsa, aheri, dhanora )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here