काय झाडी, काय शेणखताची ढिगारे आणि काय ती शौचालयाची घाण, एकदम बेकार…

349

-अस्वच्छता जोमात धानोरा नगरपंचायत कोमात, गुडमॉर्निंग पथक कुचकामी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २२ सप्टेंबर : सरकार कितीही स्वच्छतेच्या गोष्टी करत असेल, कितीही स्वच्छता मोहीम राबवित असेल तरीपण जोपर्यंत नागरिकांचा प्रत्यक्षात सहभाग नसेल तर त्या स्वच्छता मोहिमेला हरताळ फसला जातो. याचाच प्रत्यक्षात अनुभव धानोरा नगरपंचायत मधील वार्ड नंबर एक मधील व्यायाम शाळेपासून ते वार्ड नंबर २ पर्यंतचा रोड हा अस्वच्छतेने माखलेलाअसल्याचे पहायला मिळते.
व्यायाम शाळेपर्यंत बोडी आहे. या बोडी व रोड च्या बाजूला शेणखताचे मोठे मोठे ढिगारे आहे. ते शेणखताचे ढिगारे कोणाचे हा प्रश्न च आहे. व्यायाम शाळेपासून १०० मीटर पर्यंत सिमेंट रोड आहे. त्यांच्या घरापासून हॅन्ड पंपा पर्यंत अस्वच्छतेने माखला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी झाड वाढली आहे. याचाच फायदा घेऊन सकाळी व रात्री अंधारात स्त्री-पुरुष व लहान मुल उघड्यावर रस्त्याला लागून आणि काही रस्त्यावर शौचालाय बसतात. त्यामुळे शौचालय व शेणखताची दुर्गंधी मोठया प्रमाणात येते. परंतु याकडे ना नगरपंचायत लक्ष घालत आणि नगरसेवकाचे अजिबात लक्ष नाही. याची पुरेपुर कल्पना नगरसेवकांना आहे. याच रस्त्याने लोकप्रतिनिधी जातात. नगरपंचायत चे कर्मचारी सुद्धा रस्त्याने नाक दाबून जातात. पण कोणालाच काहीच दिसत नाही एकदम ओके गुवाहाटी सारखे वाटत असेल त्यांना काय झाडी काय वास, एकदम ओके. नगरपंचायत ची गाडी “का करे भैया” वाजवत कचरा गाडी येते कचरा जमा करून ठेवायचा आणि गाडी आल्यावर गाडीत कचरा टाकायचा एवढ सोपं काम आहे. परंतु त्या विद्युत पोल जवळ आजूबाजूचे नागरिक घरातील कचरा टाकून घाण करतात आणि त्याच्या बाजूच्या असणाऱ्या ओट्यावर बसून वास घेतात. आता पावसाळा सुरु आहे या शेणखताचे ढिगाऱ्यामुळे आणि उघड्यावर शौचालय केल्याने साथीचे रोग पसरले तर याला जबाबदार कोण ? नगरपंचायत व नगरसेवकाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. वेळीच नगरपंचायतने त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूची झाडे तोडून रस्ता साफ करावा व गुडमॉर्निंग पथकद्वारे उघड्यावर शौचालय करणाऱ्या वर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. धानोरा नगरपंचायत ला स्वच्छतेचा पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. पण प्रत्यक्षात स्वच्छता झालीच नाही. शालेय विद्यार्थासाठी स्वच्छतेची स्पर्धा आवर्जून राबविण्यात येते. स्वच्छतेचा संदेश देण्यात येते पन त्याचा काही उपयोग दिसत नाही. नागरिकांच्या सहभागा शिवाय स्वच्छतेची मोहीम यशस्वी होवू शकत नाही हे यातून स्पष्ट दिसून येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here