विदर्भ इंटरनॅशनल स्कूल मध्ये नवनियुक्त शिक्षकांचा स्वागत समारंभ

411

The गडविश्व
गडचिरोली, १३ एप्रिल : स्थानिक विदर्भ इंटरनॅशनल स्कूल मध्ये शैक्षणिक सत्र २०२३-२४ करिता नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांचा स्वागत समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या निहारिका मंदारे व व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रिती मुंढे उपस्थीत होत्या. याप्रसंगी सर्व शिक्षक वर्गाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांकडून पुढील सत्रामध्ये विद्यार्थी व शाळेच्या विकासासाठी प्रयत्न करण्याची व आपली कर्तव्य व जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठीची शपथ घेण्यात आली. मोनाली नागपुरे यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. शाळेच्या प्राचार्या निहारिका मंदारे यांनी शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रशांती वाघमारे यांनी मानले.

(The gdv) (the gadvishva)(gadchiroli news) (vidarbha international school gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here