कुरखेडाचे तहसिलदार सोमनाथ माळी यांची बदली

1203

– नागपूर विभागातील तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्या
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, १४ एप्रिल : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तहसील कार्यालयाचे तहसिलदार सोमनाथ माळी यांच्यासह नागपूर विभागातील तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने काढले आहे.
महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्य पार पडतांना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम २००५ च्या कलम ४(४) मधील तरतुदीनुसार तहसिलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना प्रशाकीय कारणास्तव बदली आदेश काढण्यात आले आहे. सदर आदेश तात्काळ अंमलात येत असून बदली आदेशातील अधिकाऱ्यांना बदलीने पदस्थापना दर्शविण्यात आलेल्या पदावर तात्काळ रुजू होण्यासाठी ते धारण करत असलेल्या पदावरून या आदेशानुसार एकतर्फी कार्यमुक्त करण्यात येत असून १७ एप्रिल २०२३ पर्यंत रुजू होणे आवश्यक आहे.
कुरखेडाचे तहसिलदार सोमनाथ माळी यांच्याकडे कुरखेडासह कोरची तहसील कार्यलयाचा पदभार होता. दोन्ही तहसील कार्यालयातील कामकाज सांभाळताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तालुक्यातील नागरिक कामकाजावर नाराज होते तसेच दोन्ही तालुक्यातील कामकाज सांभाळताना विकास कामे खोळंबत असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते, तर नागरिकांनी अनेकदा त्यांच्यावर ताशेरे ओढल्याचे नागरिकांच्या चर्चेतून समोर आले होते तसेच त्यांची बदली करण्यात यावी व कोरची तहसील कार्यालयास स्थायी तहसीलदार देण्यात यावी अशी मागणी होती. तर मागील महिन्यात कुरखेडा तालुक्यातील कुंभिटोला येथील अवैध गौण खनिज प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत चौकशी अहवाल पोहचल्याने तहसिलदार माळी यांची बदली करण्यात आल्याचे लोकचर्चेतून ऐकायला मिळत आहे.
एकूणच गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडाचे तहसिलदार सोमनाथ माळी, आरमोरीचे तहसिलदार कल्याणकुमार डहाट, अहेरीचे तहसिलदार ओंकार ओतारी यांची बदली करण्यात आली आहे.
आता तरी कुरखेडा आणि कोरची तहसिल कार्यालयाला स्थायी तहसिलदार मिळणार काय ? तालुक्यातील विकासकामे होणार काय ? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

या अधिकाऱ्यांच्या बदल्या

१) श्रीमती निलिमा सुनील रंगारी (तहसिलदार पवनी जि.भंडारा) यांची सिंदेवाही जि. चंद्रपूर तहसिलदार पदी
२) सोमनाथ बाबुराव माळी (तहसिलदार कुरखेडा जि.गडचिरोली यांची अपर तहसिलदार भिसी ता.चिमूर जि.चंद्रपूर
३) अजय चरडे (नियुक्तीच्या प्रतीक्षेत) तहसिलदार बल्लारपूर जि.चंद्रपूर या रिक्त पदावर
४) अरविंद रामजी सेलोकर (तहसिलदार सामान्य प्रशासन विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर) यांची निबंधक भूमी संपादन पुर्नवसन आणि पुनर्स्थापना प्राधिकरण जि नागपूर
५) सचिन बापूराव यादव (तहसिलदार कळमेश्वर जि.का नागपूर यांची तहसिलदार देवळी जि. वर्धा
६) राजेश सरवदे (तहसिलदार देवळी जि.वर्धा) यांची तहसिलदार कामठी जि. नागपूर
७) गजानन सुरबाजी कोकड्डे (खरेदी अधिकारी जि.पुरवठा कार्यालय गडचिरोली) यांची तहसिलदार देसाईगंज
८) प्रशांत रामदास घोरुडे (तहसिलदार तिरोडा जि.गोंदिया यांची तहसिलदार भामरागड
९) श्रीमती हंसा चतुर्भुज मोहने (तहसीलदार(जमीन), विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर) यांची तहसिलदार रामटेक जि.नागपूर
१०) विद्यासागर चव्हाण (तहसिलदार आर्वी जि.का.वर्धा) यांची तहसिलदार (सामान्य प्रशासन) वि.आ.कार्यालय नागपूर
११) संजय वामन पवार (तहसिलदार, उपप्रबंधक, म.म.न्या,वि.आ.कार्यालय नागपूर) यांची तहसिलदार (निवडणूक) जि.का.नागपूर
१२) राहुल सारंग (तहसिलदार (निवडणूक) जि.का.नागपूर) यांची तहसिलदार उपप्रबंधक, म.म.न्या, वि.आ.कार्यालय नागपूर)
१३) कल्याणकुमार युवराज डहाट (तहसिलदार आरमोरी जि. गडचिरोली) यांची तहसिलदार भिवापूर जि.नागपूर १४) गणेश जयराम जगदाळे (तहसिलदार सिंदेवाही जि.चंद्रपूर) यांची तहसिलदार कर्जत जि.अहमदनगर
१५) बाळासाहेब दादासाहेब म्हस्के (तहसिलदार रामटेक जि.का. नागपूर) यांची तहसिलदार श्रीवर्धन जि.रायगड, १६) ओंकार ओतारी (तहसिलदार अहेरी, जि. गडचिरोली) यांची तहसिलदार वेंगुर्ला जि.सिंधुदुर्ग
१७) श्रीमती चैताली सावंत (तहसिलदार संगांयो जि.का.नागपूर) यांची तहसिलदार (अकृषक), कुर्ला-१, जि. मुंबई उपनगर
१८) निलेश प्रकाश गौड (निमुक्तीच्या प्रतीक्षेत) यांची अपर तहसिलदार मिरा भाईंदर, जि.का.ठाणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here