– पाणी घ्यावे लागत आहे विकत
The गडविश्व
प्रतिनिधी / यवतमाळ, २७ जून : उन्हाळ्यात पाण्याची टंचाई पाहावयास मिळत असते मात्र ढाणकी येथे भर पावसाळ्यात पाण्याची समस्या जाणवत असल्याचे चित्र असून पाणी विकत घ्याण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
सध्या पेरणीचे दिवस चालू असून पेरणीच्या दिवसात शेतातील कामाची लगबग चालू आहे. शेतातील कामे सध्या स्थितीत अती महत्वाची आहे. परंतु पाण्याची टंचाई असल्यामुळे शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्यामुळे उशीर होत आहे. गावातील जास्तीत जास्त लोक शेती करतात. अशा या पेरणीच्या दिवसात सुद्धा मजूरदार नळाला पाणी सोडण्यात आले तर मजूरदार त्या दिवशी घरीच रहात आहेत. शेतकरी मात्र या मुळे अत्यंत अडचणीत अडकलेला दिसून येत आहे. तर नळाला पंधरा-पंधरा दिवस पाणी नसल्याने मात्र शंबर रुपये टाकी प्रमाणे पाणी विकत जघ्यावे लागत असल्याचे दृश्य पाहावयास मिळत आहे.
यामुळे शेतकरी काय तर चक्क लोकप्रतिनिधी सुद्धा पाणी पुरवठा अभियंत्यांवर वैतागले आहेत. ग्रामपंचायत असतानाच दोन कोटी रुपये जोडणीकरून पाईप लाईन द्वारे गावात पाणी आणण्याचे नियोजन आखले गेले होते. ग्रामपंचयतचे रुपांतर नगरपंचायत मध्ये होऊन तीन वर्षाचा कार्यकाळ निघून गेला तरी पाण्याची जैसी तीच अवस्था आहे. याला काय म्हणावे नगर पंचायत ढिसाळ कारभार का ? तर जनतेमध्ये सुद्धा अनेक प्रश्न निर्माण होत आहेत की, नगरपंचायत मधील लोकप्रतिनिधी जनतेसाठी एकमताने ठराव घेत नाहीत का ? जनतेसाठी सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी एकत्र येत नाहीत का? असे असेल तर यास लोकप्रतिनिधी सुद्धा तेवढेच पाणी प्रश्नासाठी तेवढेच जबाबदार ठरत नाहीत का ?
एकूण एकावर चिखलफेक करून पाण्याचा प्रश्न मिटणार नसून सर्व नेते मंडळी लोकप्रतिनिधी एकत्र येणे आवश्यक आहे. मात्र जनतेच्या प्रश्नासाठी कोणताही लोकप्रतिनिधी अथवा पुढारी एकत्र आलेला दिसून येत आहे. पाणीपुरवठा अभियंता कोणत्याही लोकप्रतिनिधी ला जुमानत नाही का? असे असेल तर नका पेक्षा मोती जड आहे का? लोकप्रतिनिधींचे च कोणी काही ऐकत नसेल तर सामान्य नागरिकांचे कोण जुमाननार हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. गावातील अशा या राजकारणामुळे याचा त्रास मात्र आम जनतेला सोसावा लागत आहे.
