The गडविश्व
गडचिरोली, २७ जून : दारूच्या व्यसनामुळे त्रस्त झालेल्या 86 रुग्णांना दारुचे दुष्परिणाम लक्षात येताच, त्यांनी मुक्तीपथ तर्फे आयोजित गाव पातळी शिबिराचा लाभ घेऊन दारूमुक्त होण्याचा निर्धार केला.
गडचिरोली तालुक्यातील मारोडा येथे गाव संघटनेच्या मागणीनुसार व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 24 रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. सिरोंचा तालुक्यातील चिटूर गावामध्ये मुक्तिपथच्या मार्फतीने गाव पातळी व्यसन उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिरामधे नविन 18 व जुने 3 असे एकूण 21 रुग्णांनी उपचार घेतला. पूजा येल्लूरकर यांनी समुपदेशन केले. तर दशरथ व साईराम यांनी केस हिस्ट्री घेतली. शिबिराचे नियोजन स्पार्क कार्यकर्त्ता साईराम व रुग्णांची नोंदणी शंकर आणि तालुका संघटिका सुनिता भगत यांनी केली. यशस्वीतेसाठी सरपंच लच्छु मड़े व गाव संघटन सदस्यांनी सहकार्य केले. चामोर्शी तालुक्यातील सिंगंनपल्ली येथे गाव व्यसन उपचार शिबिरात 10 रुग्णांनी नोद केली 8 जणांनी पूर्ण उपचार घेतला. एटापल्ली तालुक्यातील कारमपली येथे एक दिवसीय व्यसन उपचार शिबिर घेण्यात आले. त्यात 12 रुग्णांनी नोंदणी करून पूर्णपणे उपचार घेतला. शिबिरामध्ये रूग्णांची नोंदणी रूणाली कुमोटी हिने केली. केश हिट्री दशरथ व रूनाली यांनी घेतली.शिबिराचे नियोजन रवि वैरागडे यांनी केला आणि शिबिर यशस्वी करण्याकरिता गावातील पाटील व मुक्तीपथ गाव संघटनेचे अध्यक्ष लालसु रापांजी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यांनी सहकार्य केले. चामोर्शी तालुक्यातील मक्केपली चेक न. 1 येथे गाव पातळी शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये 23 रुग्णांनी नोंदणी केली व 21 रुग्णांनी पूर्णवेळ उपचार घेतला . या शिबिराचे नोंदणी , नियोजन आनंद सिडाम यांनी केले. केस हिस्ट्री प्रभाकर केळझरकर व समुपदेशन व गृप शेसन छत्रपती घवघवे यांनी केले . शिबिर यशस्वी करण्याकरिता संघटना अध्यक्ष चक्रपाणी खोब्रागडे , गाव पाटील , यांच्या सहकार्याने शिबिर पार पडले .