मुनघाटे महाविद्यालयात राजश्री शाहू महाराज जयंती साजरी

82

The गडविश्व
ता प्र / धानोरा, २७ जून : स्थानिक धानोरा येथील श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था द्वारा संचालित श्री जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे श्री. राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पंकज चव्हाण हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ राजू किरमिरे, डॉ.एच लांजेवार, डॉ विना जंबेवार, डॉ.पी एन वाघ हे होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ पंकज चव्हाण यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन रा से यो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार प्राध्यापक गीताचंद्र भैसारे यांनी मानले.
याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक डॉ.डी.बी.झाडे, डॉ. मुरकुटे, प्राध्यापक तोंडरे, प्राध्यापक नितेश पुण्यपरेड्डीवार, प्रा वाळके, प्राध्यापक धाकडे, प्राध्यापक खोब्रागडे, प्राध्यापक रणदिवे, प्राध्यापक वटक व इतर प्रशासकीय कर्मचारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here