व्हॉईस ऑफ मीडिया गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार उत्कृष्ट सेवाकार्य विशेष पुरस्काराने सन्मानित

131

– व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी शिखर अधिवेशनात सत्कार
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०४ : शिर्डी साईंच्या पावन भूमीत नुकताच पार पडलेल्या व्हॉईस ऑफ मीडिया या विश्वव्यापी पत्रकार संघटनेच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय शिखर अधिवेशनात अतिदुर्गम, नक्षलग्रस्त, आदिवासी बहुल जिल्ह्यात केलेल्या उत्कृष्ट पत्रकारितेबद्दल व्हाॅईस ऑफ मीडिया गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार यांना सेवाकार्य विशेष पुरस्कार सन्मान २०२४ ने गौरविण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर बीडच्या माजी खासदार प्रितम मुंडे, शेतकरी नेते रविकांत तुपकर, माजी खासदार हेमंत पाटील, दै. देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे, जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, पुढारी वृत्त वाहिनीचे प्रसन्न जोशी, राजश्री पाटील, व्हाॅईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप भाई काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, प्रदेश कार्यवाहक बालाजी मारगुड, मराठवाडा विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया, पंढरिनाथ बोकारे, नांदेड जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी, बाळासाहेब पांडे आदींसह संघटनेचे देश व विदेशातील पदाधिकारी सदस्य आणि राज्यभरातील हजारो पत्रकार बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
शिर्डी साईंच्या पावन भूमीत ३१ ऑगस्ट १ सप्टेंबर या दोन दिवसीय राज्यस्तरीय शिखर अधिवेशनाद्वारे राज्य भरातील पत्रकारांसाठी दोन दिवसीय विशेष मेजवानी देत त्यांची प्रश्न पत्रकारीते पुढिल आव्हाने यावर विशेष मंथन करित यातुन निष्पन्न चर्चेतुन वेगवेगळे आठ ठराव मंजूर करून संघटनेद्वारे शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे निर्णयही घेण्यात आले. अशा व्यापक अधिवेशनात व्हॉईस ऑफ मीडिया गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार यांच्या सेवाकार्याची विशेष दखल घेऊन त्यांना व्हाॅईस ऑफ मीडियाचा सेवाकार्य विशेष पुरस्कार सन्मान २०२४ ने‌ गौरविण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी व्हाॅईस ऑफ मीडिया गडचिरोली टिमचे कौतुक करून जिल्हाध्यक्ष व्येंकटेश दुडमवार यांना पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी शिखर अधिवेशनात व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य मुकुंद जोशी, जिल्हा कार्याध्यक्ष नसीर हाशमी, कार्यवाहक कृष्णा वाघाडे, जिल्हा संपर्क प्रमुख तथा कुरखेडा तालुका संघटक चेतन गहाणे, संघटक तथा भामरागड तालुका सरचिटणीस गोविंद चक्रवर्ती, साप्ताहिक विंगच्या अध्यक्षा रेखाताई वंजारी, कार्याध्यक्ष प्रकाश दुबे, प्रसिद्धी प्रमुख मुनीश्वर बोरकर, शहर सरचिटणीस हितेश ठेंगे, सदस्य सुरज हजारे, चामोर्शी तालुकाध्यक्ष हेमंत उपाध्ये, सदस्य नामदेव वासेकर, रूमपा शहा, पांडुरंग कांबळे, खरविंद कुनघाडकर, देसाईगंज तालुकाध्यक्ष विलास ढोरे, सरचिटणीस दयाराम फटिंग, कार्यवाहक पंकज चहांदे, संघटक राजरतन मेश्राम, सदस्य घनश्याम कोकोडे, नसीर शेख, श्यामराव बारई, कुरखेडा तालुका सहसरचिटणीस विजय भैसारे, कोषाध्यक्ष महेंद्र लाडे, सदस्य विजय नाकाडे, रमेश बोरकर, राकेश चव्हाण, श्याम लांजेवार, कालिदास उईके, कोरची तालुकाध्यक्ष लीकेश अंबादे, कार्याध्यक्ष शालिकराम कराडे, सरचिटणीस मधुकर नखाते, कार्यवाहक अरुण नायक, संघटक राष्ट्रपाल नखाते, प्रसिद्धी प्रमुख प्रशांत कराडे, सदस्य नंदकिशोर वैरागडे, अहेरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोंड, कार्याध्यक्ष अशोक पागे, भामरागड तालुकाध्यक्ष लीलाधर कसारे, उपाध्यक्ष रमेश मारगोनवार, कोषाध्यक्ष महेंद्र कोठारे, सदस्य संतोष बडगे, एटापल्ली तालुकाध्यक्ष आनंद बिश्वास, सदस्य तनुज बल्लेवार आदी उपस्थित होते.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #voice of media)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here