The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, ०५ : श्री.शिवाजी शिक्षम प्रसारक मंडळ गडचिरोली व्दारा संचालित शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा मधील राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यालयातील इको क्लबच्या माध्यमातून आज ०५ सप्टेंबर २०२४ ला शासकीय ग्रामीण रुग्णालय कुरखेडा येथील परिसरामध्ये साफसफाई करण्यात आली . तसेच आज डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिनाचे (शिक्षक दिन) औचित्य साधून रुग्णालयामध्ये शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय कुरखेडा च्या वतीने फळवाटप करण्यात आले व विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वच्छतेबाबत शपथ घेण्यात आली. कनिष्ठ महाविद्यातील शिक्षकांनी श्रमदानाचे, स्वच्छता आणि समाजसेवेचे महत्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
सदर स्वछता अभियानामध्ये शासकीय ग्रामीण रुग्णालय कुरखेडा चे वैद्यकीय अधीक्षक डॉ.अमित ठमके, विद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश गौरकार, प्राध्यापक विजय मेश्राम, कालिदास सोरतेझ मनोज सराटे, गुरुदास शेंडे, रुपेश भोयरझ मुनेश्वर राउतझ स्वप्नील खेवले, ओमप्रकाश कुथे, एम.सी.व्ही.सी. विभागाचे प्रा.विवेक गलबले, प्रा.सराटे, कनिष्ठ लिपिक लोकेश राऊत, अक्षय देशमुख व बहुसंख्येने विद्यार्थी, शासकीय ग्रामीण रुग्णालय कुरखेडा येथील कर्मचारी वर्ग स्वछता अभियानामध्ये उपस्थित होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #kurkheda )