शांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माची जगाला गरज : विजय बंसोड

44

– कूरखेडा येथील बैठकीत प्रतिपादन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०५ : बौद्ध धर्म शांतीचा संदेश देणारा आहे जिवन जगण्याचा आदर्श मार्ग बौद्ध धर्मात दिलेला आहे धर्माचे ही मूख्य तत्व जनसामान्यापर्यंत पोहचण्याचे कार्य दि बुध्दिस्ट सोसायटीचा स्वंयसेवकानी करावे असे आवाहन बौद्धिक सोसायटी आफ इंडियाचे राज्य उपाध्यक्ष विजय बंसोड यानी केले.
कुरखेडा येथील बौद्ध विहारात दि बूद्धिस्ट सोसायटी आफ इंडिया संघटनेचा वतीने आयोजित तालुका पदाधिकार्यांचा सभेत मार्गदर्शन करताना विजय बंसोड बोलत होते. सभेला प्रमूख अतिथी म्हणून सोसायटीचे जिल्हा सल्लागार इंजिनियर नरेश मेश्राम, विभागीय उपाध्यक्ष अशोक इंदूरकर, देसाईगंज तालूका अध्यक्ष रमेश रंगारी आदि उपस्थित होते. यावेळी बौद्धिस्ट सोसायटीचे तालुका अध्यक्ष रोहित ढवळे यांनी सोसायटीचा तालुक्याचा आढावा सादर केला.
सभेचे सूत्रसंचालन वामन कोटागंले यांनी केले तर यशस्वीतेकरीता माधूरी ढवळे रोहीणी सहारे, हिरा वालदे, हेमलता नंदेश्वर, भाविंन्द्रा फूलझेले, यादव सहारे, विक्रम कोचे, प्रभाबाई वालदे, रमा सरदारे, बनवारी बागडे, पदमाकर वंजारी व सदस्यानी सहकार्य केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #kurkheda )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here