– आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संखेने उपस्थित राहण्याचे आमदार डॉ. होळी यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि. १७ : आदिवासी समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने सोमवार १९ ऑगस्ट रोजी ग्रामसभा पुसेर येथे सकाळी ११ वाजता “आदिवासी समाज मेळाव्याचे” आयोजन करण्यात आले आहे. या आदिवासी समाज मेळाव्याला समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आदिवासी समाज बांधव व आमदार डॉ. देवराव होळी मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.
आमदार डॉ. देवराव होळी यांनी पुसेर परिसरात विविध कामांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला आहे. दरम्यान यावेळी विविध कामांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे.