नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा : माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार

192

– गेर्रा शेतशिवारत वाघाच्या हल्ल्यात गाय ठार
The गडविश्व
अहेरी, २९ नोव्हेंबर : तालुक्यातील इंदाराम ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गेर्रा येथील मल्ला देबूडू अर्का यांच्या मालकीची गाय वाघाने हल्ला करून ठार केली.
सदर घटनेची माहिती माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना माहिती होताच त्यांनी घटनास्थळ गाठून वनविभागाला पंचनामा करिता माहिती दिली व नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करा असे निर्देश दिले.
गडचिरोली जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचत आहे. जिल्हाभरात वाघाचा धुमाकूळ असून वाघाच्या हल्ल्याच्या घटनेत वाढ होत आहे. अशातच अहेरी तालुक्यातील इंदाराम ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या गेर्रा येथील गाय वर हल्ला करून वाघाने ठार केले. सदर घटनेवर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वाघास जेरबंद करण्यात यावे असे निर्देश माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी वनविभागाला केले आहे.
घटनास्थळी भेट दिली असता त्यावेळी वनपाल शहारे, वनरक्षक कुमारे, तेजूभाऊ दुर्गे, प्रकाश पेंदाम, चिन्नु अर्का, जलपत अर्का, पांडु अर्का, गंगाराम तोर्रेम, अजय अर्का, साईनाथ अर्का, लक्ष्मण आत्राम, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here