भामरागडच्या पुरात तीन गंभीर रुग्णांचे एअरलिफ्ट; लॉयड्सकडून तातडीची वैद्यकीय मदत

11

भामरागडच्या पुरात तीन गंभीर रुग्णांचे एअरलिफ्ट; लॉयड्सकडून तातडीची वैद्यकीय मदत
– हेडरीतील LKAMH रुग्णालयात उपचार सुरू; पूरग्रस्त ३०० हून अधिक नागरिकांना ORS, अल्पोपहाराचीही मदत
The गडविश्व
भामरागड,दि. २८ : भामरागड परिसरात पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असताना गंभीर रुग्णांसाठी लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड धावून आले आहे. जमीनीवरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याने उपचारासाठी तातडीने बाहेर काढणे आवश्यक असलेल्या तीन गंभीर रुग्णांना २७ सप्टेंबर रोजी आपत्कालीन एअरलिफ्टद्वारे हेदरी येथील लॉयड्स काली अम्मल मेमोरियल हॉस्पिटलमध्ये (LKAMH) दाखल करण्यात आले.
एअरलिफ्ट करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये अपेक्षा रुशी आलम (२५) यांना Acute Febrile Illness, Myalgia तसेच Sickle Cell Disease, रोशन चिन्ना मडावी (२१) यांना Sickle Cell Disease, Vaso-Occlusive Crisis आणि गंभीर रक्तक्षय, तर संगीता चुक्कू उसेंडी (७) या बालरुग्णाला Sickle Cell Disease आणि Cerebral Malaria असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
पूरग्रस्त भागातून तिन्ही रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढून LKAMH येथे दाखल करण्यात आले. बालरोग तज्ज्ञ डॉ. बालाजी व्ही. व डॉ. स्वाती रेड्डी तसेच फिजिशियन डॉ. पोरस यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सातत्यपूर्ण निरीक्षण आणि वेळेवर उपचारामुळे तिन्ही रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी छातीत दुखत असल्याची तक्रार असलेल्या ४२ वर्षीय सुखदेव उगले यांनाही भामरागड येथून आपत्कालीन एअरलिफ्ट करण्यात आले होते. त्यांना कोंसरी येथे आणल्यानंतर पुढील उपचारांसाठी रुग्णवाहिकेने चंद्रपूरला पाठविण्यात आले.

पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात

लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड आणि लॉयड्स इनफिनिट फाउंडेशनच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी वैद्यकीय पथके, औषधे आणि मेडिकल कंज्यूमेबल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आतापर्यंत ३०० हून अधिक नागरिकांना फळे, अल्पोपहार आणि ORS देण्यात आले आहेत. परिस्थिती सुधारल्यानंतर प्रभावित कुटुंबांना फूड किट, ब्लँकेट, साड्या आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्याची तयारीही करण्यात आली आहे.
लॉयड्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या मार्गदर्शनाखाली हे मदतकार्य सुरू आहे. पूरस्थिती निवळेपर्यंत प्रभावित नागरिकांना वैद्यकीय मदत आणि आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी पथके कार्यरत राहणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here