दारूमुक्तीची मशाल पेटवून धावले गावकरी

126

– मुलचेरातील विविध गावात मॅराथॉन स्पर्धा
The गडविश्व
गडचिरोली, १२ जानेवारी : गावातील अवैध दारूविक्री विरोधात शक्तिप्रदर्शन करण्याच्या उद्देशाने मुक्तिपथ व गाव संघटनेच्या संयुक्त विद्यमाने मुलचेरा तालुक्यातील भगवंतनगर, गट्टा, लक्ष्मीपुर, देवदा, देवनगर व श्रीनगर येथे मुक्तिपथ मॅराथॉन दौड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या गावातील एकूण २३४ महिला, पुरुष व युवक-युवतींनी दारूमुक्तीची मशाल पेटवून स्पर्धेत सहभाग घेतला.
भगवंतनगर येथील स्पर्धेत ४९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी सरपंच जया मंडल, पोलिस पाटील सीता मंडल, गाव संघटना अध्यक्ष दीपाली रॉय, गुलाबी रॉय आदी उपस्थित होते. गट्टा येथे गाव पाटील गणपत मोहंदा, पेसा अध्यक्ष शंकर मोहंदा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या स्पर्धेत ३४ जणांनी सहभाग दर्शविला. लक्ष्मीपुर येथील स्पर्धेतून ४७ जणांनी शक्तिप्रदर्शन केले.सोबतच मुक्तीपथ गाव संघटना गठीत करण्यात आली. यात पोलिस पाटील नागेन सेन, सुमित्रा मुजुमदार, कांचन मंडल, रुपाली रॉय, जमूना मंडल, संगीता मंडल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. देवदा येथील स्पर्धेत ३४ जणांनी सहभाग घेतला. यावेळी सरपंच केसरी तेलामी, उपसरपंच संतोष तुमरेटी, तंमुस अध्यक्ष गोविंदा कोलामी, चिम्मा कांदो, दिलीप हिचामी उपस्थित होते. देवनगर येथील स्पर्धेत ३५ जणांनी सहभाग घेतला. यावेळी पोलिस पाटील आशा मुजुमदार, मुक्तीपथ संघटना सचिव प्रभावती रॉय यांच्यासह गावकरी उपस्थित होते. श्रीनगर येथील स्पर्धेतून ३५ जणांनी एकी दाखवली. अशा विविध गावातील एकूण २३४ जणांनी सहभाग दर्शविला. विविध गटातून घेण्यात आलेल्या स्पर्धेत अव्वल आलेल्यांची मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सोबतच लोकांना अवैध दारूविक्री विरोधात एकतेने लढा देण्याचे आवाहन करण्यात आले.या उपक्रमाचे नियोजन मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, स्पार्क कार्यकर्ता नम्रता मेश्राम व विविध गावातील गाव संघटनेच्या सदस्यांनी सहकार्य केले.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Veera Simha Reddy) (Swami Vivekananda Birthday) (HBSE Date Sheet 2023) (PAK vs NZ) (Golden Globes 2023) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here