-खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते सहकार प्रशिक्षण कार्यशाळेचे उदघाट्न
The गडविश्व
गडचिरोली, दि. १० : गडचिरोली जिल्हा पगारदार कर्मचारी व नागरी तथा ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंसंस्था च्या वतीने आयोजित सहकार प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाट्न गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांच्या हस्ते संपन्न झाले.
सावकारशाहीतून मुक्तता देण्याचे काम सहकार क्षेत्राने केले असून सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक स्तिथी सुधारण्याचे काम सहकारी संस्था व पतसंस्थेच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. किरसान यांनी केले. त्याचप्रमाणे पतसंस्था योग्य पद्धतीने कश्या चालतील या संदर्भात मार्गदर्शन देखील खासदार डॉ. किरसान यांनी केले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हनून अध्यक्ष गडचिरोली नागरी सह. पतसंस्था गडचिरोली तथा शिवाजी शिक्षन प्रसारक मंडळ चे अध्यक्ष अनिल पा. म्हशाखेत्री जी, दिलीप जी खेवले, प्रा. शेषरावजी येलेकर, सुमतीताई मुनघाटे, सुलोचनाताई वाघरे, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे सह जिल्ह्यातील विविध पतसंस्थाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
