निमगावात पेसा व वनहक्क कायदा महोत्सव उत्साहात संपन्न
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २५ : धानोरा तालुक्यातील निमगाव येथे इलाख्यातील सर्व ग्रामसभा संघटना इलाखा रांगी (जमीदारी) यांच्या वतीने बुधवार, दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी कोया कायतूर गोटुल भूमी येथे पेसा आणि वनहक्क कायदा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामसभा सक्षमीकरणासाठी संपूर्ण देशात अग्रणी भूमिका बजावणाऱ्या धानोरा तालुक्यातील ग्रामसभांच्या कार्याचा गौरव यावेळी करण्यात आला.
ग्रामसभांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन व प्रशासकीय सहकार्य देत त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलेल्या जिल्हा प्रशासनाचा ग्रामसभांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त शिक्षक महेंद्र काटेंगे (गडचिरोली) होते. उद्घाटन माजी सीताटोला इलाखा रांगी सुखदेव हलामी व निमगावचे रैसु गावडे यांच्या हस्ते झाले. उपाध्यक्षपदी ज्येष्ठ बौद्ध समाजसुधारक लालाजी नगराळे (निमगाव) होते, तर ध्वजारोहण दिलीप काटेंगे रांगी यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. देवाजी तोफा (मेंढा), गणपत नरोटे, श्रीरामजी आतला, किरण वटपल्लीवार (तहसील कार्यालय धानोरा), निशा कांबळे (तहसील कार्यालय धानोरा), राजेंद्र भांडारकर (धानोरा), सेवानिवृत्त शिक्षक मारोतराव बोबाटे (निमगाव), माजी पोलीस पाटील दामजी, माजी पोलीस पाटील यशवंत लाकूडवाय (बोरी), चेतन सुरपाम (उपसरपंच, गट ग्रामपंचायत निमनवाडा), शिवानी बोगा आदींचा शाल व श्रीफळ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, मुख्याध्यापक बाळकृष्ण सावसागडे (गणेश अलंकार विद्यालय, निमगाव), शिक्षक दिवाकर भोयर, भांडारकर साहेब, मुळे मॅडम, नाकाडे मॅडम, बोरकर मॅडम, कावडे मॅडम, सुरेंद्र हलामी (पोलीस पाटील, कन्हाळगाव), मन्साराम कोल्हे, बोगा रांगी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामसभा सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना सुखदेव दुगा (ग्रामसभा मासरीगाटा) यांनी केली. सूत्रसंचालन देविदास उसेंडी (ग्रामसभा कन्हाळगाव) यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजीनाम कोवे यांनी मानले. पेसा व वनहक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसभांचे सक्षमीकरण हीच खरी लोकशाही असल्याचा संदेश या महोत्सवातून देण्यात आला.














