धानोराच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्याला आमदारानी धरले धारेवर

256

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, १८ फेब्रुवारी : पंचायत समिती धानोराची वार्षिक आमसभा १६ फेब्रुवारीला ला जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणावर आयोजित करण्यात आली. या आढावा बैठकीला गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी अध्यक्ष होते तर या बैठकीला माजी आमदार आनंदराव गेडाम, तहसीलदार वीरेंद्र जाधव, संवर्ग विकास अधिकारी सतीश चुटकुले, ग्रामीण रुग्णालय अधीक्षक गजबे, माजी जिल्हा परिषद सदस्य लताताई पुंगाटे, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, सहाय्यक गट विकास अधिकारी एम ए कोमलवार, बाल विकास प्रकल्प अधिकारी कटरे, तालुका आरोग्य अधिकारी देवगडे मॅडम, गटविकास अधिकारी अरवेली, शशिकांत साळवे पत्रकार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या आढावा बैठकीला शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आमदारांनी संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरत आत्तापर्यंत शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यात का गेले नाहीत, बारदान्याचे पैसे तसेच ऑनलाईन केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे एकही धान्य त्यांच्या घरी राहणार नाही यासाठी ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक यांना त्यांच्या घरी जाऊन चौकशी करून किती धान्य शिल्लक आहेत याची एका आठवड्यात चौकशी करून अहवाल देण्याचे सांगितले
२०१९ -२० मध्ये १९ मध्ये लोकांची मक्का खरेदी केली त्या शेतकऱ्यांचे मक्याचे पैसे अजून पर्यंत मिळालेले नाही तो मक्का मुरूमगाव च्या गोडाऊन मध्ये असून खराब झाला आहे त्याची विल्हेवाट लावायची आहे. जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागात जे काम अपूर्ण राहिले आहे त्याची सात दिवसाच्या तात्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच अंगणवाडी दुरुस्ती करण्याचेही प्रस्ताव ठेवण्यात आले. आदिवासी विकास विभागाअंतर्गत ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत विहिरीचे पूर्ण काम झाले परंतु त्याचे दोन वर्षापासून पैसे मिळालेले नाहीत याही अधिकाऱ्याला धारेवर धरत सात दिवसाच्या आत चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले. तसेच पाणीपुरवठा विभागात अंतर्गत जे पाईपलाईन टाकलेली आहे ती बोगस आहे त्याचीही चौकशीचे आदेश आमदारांनी दिले आहे. खुटगाव ग्रामपंचायत अंतर्गत जलजीवन मिशन योजनेच्या प्रलंबित कामाची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले तसेच तात्काळ उरलेले कामे सुद्धा पूर्ण करण्याची निर्देश दिले. यावेळी विद्युत वितरण विभागालाही निर्देश देण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायती अंतर्गत सोलर पंप बसविण्यात सांगितले, पंधराव्या वित्त आयोगानुसार घनकचरा व्यवस्थापन, खुटगाव ग्रामपंचायत तिला घंटागाडी देण्यात यावी तसेच ग्रामसेवक व ठेकेदार सरपंचाला न विचारता कामे करतात यानंतर असे होणार नाही असे निर्देश आमदारांनी दिले आहेत. डंपिंग यार्ड चातगाव, येरकड, रांगी येथे मंजूर केले आहे त्याचबरोबर राशन दुकानदारांनी नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्याचे राशन मोफत न देता त्या बदल्यात पैसे घेतले असे आरोप यावेळेस नागरिकांनी लावलेत त्याचेही चौकशीचे आदेश आमदारांनी दिले आहेत. धानोरा तालुक्यातील पी एम जे एस वाय अंतर्गत रस्ता बांधण्यात आलेला होता तो पाच वर्षाच्या आत मध्ये उखडला तर त्याची चौकशी करून पंधरा दिवसाच्या आत त्या कामाची दुरुस्तचे काम सुरू करावे असे निर्देश संबंधित विभागाला निर्देश दिले. अशाप्रकारे सदर सभा ही काही प्रमाणात वादळी ठरली. वरील दिलेल्या चौकशीचे अहवाल किती दिवसात मिळेल आणि त्याच्यावर कोणती कार्यवाही आमदार करणार व पुढे कोणते पाऊल उचलणार हे पाहणे अगत्याचे ठरेल.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Shivratri images) (Karachi J-Hope) (Mahashivratri 2023) (Barcelona vs Man United) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here