रांगी येथील लक्की वरखडेची केळापुर विद्यानिकेतन शाळेसाठी निवड

435

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १८ फेब्रुवारी :

तालुक्यातील रांगी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थी लक्की डंबाजी वरखडे यांची यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर येथील विद्यानिकेतन शाळे करीता निवड झाल्या बदल त्याचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
सन २०२१-२२ मधे लक्की ने इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत असतांना प्रवेश परीक्षा दिली होती ती यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्यामुळे त्यांची यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर येथील शासकीय विद्यानिकेतन संस्थेसाठी निवड झाली आहे. शासकीय परीक्षा मंडळ पुणे प्रसारित केलेल्या विद्यानिकेतन निवड यादीत त्याचे नाव समाविष्ट असून गुणवत्ता यादी त्याचा क्रमांक ५१ वा आहे. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या कळापूर येथील विद्यानिकेतन शाळेत इयत्ता सहावीला प्रवेश दिला जातो शाळेत ६ ते १० वी पर्यंत शिक्षणाची सुविधा आहे. या शाळेत विदर्भातील नऊ जिल्ह्यातून व महाराष्ट्राच्या आदिवासी क्षेत्रातून विद्यार्थी निवडले जातात. त्यात सामान्य भागाचे ३० व आदिवासी विभागाचे ३० असे एकूण ६० विद्यार्थीना दरवर्षी सहावीला प्रवेश देतात. त्याच्या या निवडी बदल शाळा समिती अध्यक्ष नरेंद्र भुरसे, सदस्य आणि शाळेतील शिक्षक महेंद्र कुकडकर मुख्याध्यापक, व्हि.यु. परशुरामकर पदविधर शिक्षक, एच.डि.काटेंगे, व्हि एन.दोडके, एन.टि.जांगी, बि.के.सयाम मँडम, यांनी अभिनंदन केले आहे.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Shivratri images) (Karachi J-Hope) (Mahashivratri 2023) (Barcelona vs Man United) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here