‘The गडविश्व’ च्या बातमीची दखल : गोंडवाना विद्यापीठाने या ‘परीक्षा’ मध्ये केला बदल

1035

– बातमी प्रकाशीत होताच घेतली दखल
The गडविश्व
गडचिरोली, २६ डिसेंबर : ‘गोंडवाना विद्यापीठाच्या ‘परिक्षा’ वर प्रश्नचिन्ह’ या मथडयाखाली १८ डिसेंबर रोजी ‘The गडविश्व’ या न्यूज चॅनल ने बातमी प्रकाशीत केली होती. या बातमीची दखल घेत गोंडवाना विद्यापीठाने त्या ‘परिक्षा’ मध्ये बदल केला आहे.
मात्र या ‘परिक्षा’ बाबत अनेक स्तरातून विद्यापीठावर ताशेरे ओढण्यात येत होते. काही महिने होवूनही या ‘परिक्षा’ बाबत चुक विद्यापीठाला लक्षात आली नाही का ? असा प्रश्न उपस्थित होत असतांना ‘The गडविश्व’ न्यूज चॅनल ने ‘गोंडवाना विद्यापीठाच्या ‘परिक्षा’ वर प्रश्नचिन्ह या मथडयाखाली’ बातमी प्रकाशित करून ‘परिक्षा’ प्रकरण उजेडात आणले व बातमीची दखल घेवून गोंडवाना विद्यापीठाने ‘परीक्षा’ मध्ये असा बदल केला.
‘गोंडवाना विद्यापीठाच्या परिक्षा वर प्रश्नचिन्ह’ हा मथडा बघून व बातमी वाचून अनेकांच्या मनात प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. तसेच ‘परिक्षा’ वर अनेक चर्चा सुरू होत्या. विविध प्रश्न गोंडवाना विद्यापीठाचे विभाग प्रमुख, समन्वयक, यांच्यावर उपस्थित होत होते. एवढेच नाहीतर विद्यापीठाचे कुलगुरू यांनाही ‘परिक्षा’ हा प्रकार लक्षात आला नाही का ? असा सवाल विद्यापीठ परिसरातून जाणाऱ्या नागरिकांकडून करण्यात येत होता. विद्यापीठ परिसरातून जाणारे नागरिक, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी यांच्या ध्यानात हि चुक निदर्शनास आली मात्र विद्यापीठाच्या निदर्शनास का आली नाही ? असा सवाल करण्यात येत होता. त्या चुकीमुळे विद्यापीठावर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत होते. मात्र या सर्व प्रकाराची ‘The गडविश्व’ न्यूज चॅनल ने बातमी प्रकाशित करून ‘परिक्षा’ मधील चूक उजेडात आणली व विद्यापीठाने ‘परिक्षा’ मध्ये बदल केला आहे.

काय होता ‘परिक्षा’ वर प्रश्नचिन्ह ? काय होता प्रकार ?

२ ऑक्टोबर रोजी विद्यापीठच्या अकराव्या वर्धापन दिनी परीक्षा भावनांच्या इमारतीचे लोकार्पण व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा भवनावर ठळक अक्षरात ‘परिक्षा भवन’ असे लिहिलेले मोठ फलक लावण्यात आले. मात्र यामध्ये लिहिण्यात आलेल्या ‘परिक्षा’ या शब्दात व्याकरण चुक होती. ‘परिक्षा’ या शब्दामध्ये मध्ये दीर्घ विलांटी असणे आवश्यक होते मात्र या फलकात रर्स्व विलांटी असल्याने ही मोठी घोडचुक होती. केवळ परीक्षा भवनावर लावण्यात येणाऱ्या फलकावरच नाहीतर परीक्षा भवनाच्या मुख्य व्दारावर सुध्दा चुकीच्या पध्दतीने ‘परिक्षा भवन’ असे लिहिलेले फलक लावण्यात आले होते. विद्यापीठ जर अशा चुका करत असेल तर विद्यार्थ

मात्र विद्यापीठाने बातमीची दखल घेत लगेच दुसऱ्या दिवशी ते फलक उतरवून त्यात आता बदल केला आहे.
मात्र विद्यापीठाकडून अशाप्रकारची चुक होण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते तर विद्यापीठातील मराठी विभाग समन्वयक यांच्या निदर्शनास हि चूक आली नाही काय ? तो प्रकार लक्षात आला नाही काय असा मात्र प्रश्न उपस्थित होत असून विद्यापीठाकडून पुन्हा अशा किती चुका झाल्या आहेत हा मात्र संशोधनाचा विषय आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Tom Cruise) (China Covid) (World Cup) (PSG) (Olivier Giroud) (Deepika Padukone FIFA) (Closing ceremony World Cup 2022) (Muktipath) (Charles Sobhraj) ( Nasal vaccine) (Imran Khan) (Sikkim accident) (Hyderabad FC) (The Gadvishva News Note : Gondwana University has changed this ‘examination’ Word) (Telugu actor Chalapathi Rao) ( Ravichandran Ashwin) (Jesus) (The Witcher: Blood Origin) (Tunisia)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here