दि.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा वर्धापन दिन वडसा शाखेत साजरा

132

The गडविश्व
देसाईगंज, दि. १० : दि. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेने ४० वर्ष पूर्ण केल्या बद्दल बँकेचा वर्धापन दिन शाखा वडसा येथे साजरा करण्यात आला. यावेळी बँक व्यवस्थापकांनी ग्राहकांना बँकेतील सुविधा, ठेवी आणि उपलब्ध कर्जे यांची सखोल माहिती दिली.
गडचिरोली जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चाळीस वर्षा पासून कार्यरत असुन आजच्या स्थितीत जिल्हा च्या कानाकोपऱ्यात ५७ शाखा आहेत. त्यावरुन बँकेची प्रगती लक्षात येते. शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत असलेल्या बँकेने अनेक क्षेत्रांत प्रगती साधली. ग्राहकांना मोठ्या प्रमाणात कर्ज सुविधा, ठेवी सह एटीएम आणि अत्याधुनिक सुसज्ज इमारती सह मागील ४० वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या विश्वासात उतरलेली एकमेव बँक असल्याने येथील कर्मच्याऱ्यानी बँकेचा ४० वा वाढदिवस ८/११/२०२४ ला वडसा येथील शाखेला सजवून आणि ग्राहकांना मिठाई वाटून साजरा करण्यात आला. यावेळी शाखेचे शाखा व्यवस्थापक एस. एन. मेश्राम, उपशाखा व्यवस्थापक सौ. एस .डी .भोयर, निरीक्षक पि.आर. पुण्यप्रेड्डीवार सह इतर कर्मचारी दुपारे, खेडकर, वाकडे, लाडसे, सौ. किरसाण आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here