संकटात पडलेल्या कुटुंबाला जि.प. माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या कडून आर्थिक मदत

317

– देवलमारी येथील मंचर्ला परिवारातील तीन घरे जडून खाक, सर्व कुटूंब उघड्यावर
The गडविश्व
अहेरी, दि. ०३ : मुख्यालया पासून बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या देवलमारी येथील मंचर्ला कुटुंब रात्रो गाढ झोपेत असतांना अचानक त्यांच्या घराला आग लागल्याची घटना ३ मार्च रोजी पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत शेखर मुत्तय्या मंचर्ला, संतोष मुत्तय्या मंचर्ला व मुत्तय्या मंचर्ला या तिघाचे घरे व घरातील संपूर्ण सामुग्री कपडे, खाण्यापिण्याचे सामान तसेच घरातील महागडे वस्तू अचानकपने आग लागून जळाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेची माहिती जि.प.माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना कळताच त्यांची देवलमारी गावात जाऊन मंचर्ला कुटुंबाची भेट घेऊन आर्थिक मदत केली.
मंचर्ला कुटुंब हे रात्रो जेवण करून झोपी गेले. दरम्यान पहाटे सव्वातीन वाजताच्या सुमारास गाढ झोपेत असतांना घराला आग लागल्याचे कळताच ते घटबाहेर निघून आरडाओरड केली. यावेळी गावातील नागरिकांनी धाव घेत आग नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला तसेच घटनेची माहिती परिसरातील आविसं – काँग्रेसचे कार्यकर्त्यांकडून तसेच नागरिकांनी आविसं – काँग्रेस नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांना सांगताच कंकडालवार यांनी नगरपंचायत अहेरी येथील अधिकाऱ्यांना दूरध्वनी द्वारे घटनेची माहिती दिली. अधिकाऱ्यांनी लगेच अग्निशमन वाहन तात्काळ घटनेच्या ठिकाणी पाठवून दिले.
माजी जि.प.अध्यक्ष कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी घटनास्थळी धाव घेऊन. घटनेची माहिती जाणून घेतली व दूरध्वनी वरून घटनेचे माहिती उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदारांना सांगून लवकरात लवकर पंचनामे करून मंचर्ला कुटूंबाला शासना कडून मदत करण्यात यावी असे सांगितले. त्यावेळी त्या तीनही कुटुंबियांना प्रथम जीवनावश्यक वस्तूसाठी अजय कंकडालवार यांनी आर्थिक मदत केली.
यावेळी वैभव कंकडालवार ग्रा.प.उपसरपंच इंदाराम, ग्रा.प.सदस्य महेश लेकुर, विद्या राऊत, ग्रा.प.सदस्य संजूबाई आत्राम, संजय गोडेवार, वैकटेश पानेम, सतीश बिचाला व आदी आविसं – काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here