– कुरखेडा येथे स्वातंत्रवीर वि .दा. सावरकर गौरव यात्रा संपन्न
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ६ एप्रिल : शहरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मी सावरकर या भावनेने तालुक्यातील शेकडो नागरिक सावरकर गौरव यात्रेमध्ये सहभागी झाले होते.
आमदार कृष्णा गजबे यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांच्या जाज्वल देशभक्तीचा महिमा वर्णन केले. यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या संदर्भात व देशभक्त क्रांतिवीरांच्या संदर्भात अपमान जनक शब्द कोणी उच्चारले तर त्यांची गय केल्या जाणार नाही असे विचार सुद्धा प्रगट केले.
भारत देशाच्या स्वातत्र्यलढ्यात सुमारे ७ लक्ष देशभक्त क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, तेव्हा कुठं भारताला स्वातंत्र्य मिळाले. देश गुलामगिरीत असताना प्रखर राष्ट्रवादाची ज्वाला जागृत करून इंग्रजी राजवटीचा पाया हलाविनारे ज्यांना इंग्रजांनी काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावून ज्यांचा अगणित छळ केला अश्या “स्वातंत्रवीर सावरकर” यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याच्या हेतुने भारतीय जनता पार्टी तालुका कुरखेडा यांच्या श्रीराम मंदिर श्रीराम नगर कुरखेडा येथून सावरकर गौरव यात्रेला सुरुवात करून शहराच्या मुख्य भागातून शोभायात्रा निघत गांधी चौक कुरखेडा येथे गौरव यात्रेचा समारोप करण्यात आला.
यावेळी भा.ज. पा. जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, आमदार कृष्णा गजबे, प्रा. बोरकर, गणपत सोनकुसरे यांनी स्वातंत्र्यवीर, विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
या गौरव यात्रेत भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, आमदार कृष्णा गजबे, विश्व हिंदू परिषद चे जिल्हाध्यक्ष वामनराव फाये, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतींभाऊ कुकरेजा, भाजयुमो जिल्हाध्यक्ष चांगदेव फाये, मुख्य वक्ते प्रा.बोरकर, भाजपा जेष्ठ नेते गणपत सोनकुसरे, विश्व हिंदू परिषदेचे प्रल्हाद पाटील खुणे, पुंडलिक नागपूरकर महाराज, भाजप तालुका अध्यक्ष नाजूक पूराम, भाजपा शहर अध्यक्ष रविंद्र गोटेफोडे, भाजपा तालुका महामंत्री अडो. उमेश वालदे, सभापति प्रा.अतुल झोडे प्रा. नागेश्वर फाये, नगरसेवक रामभाऊ वैध, नगरसेवक, सागर निरंकारी, उपसभापती नगरसेविका दुर्गा गोटेफोडे, नगसेविका अल्का गिरडकर, नगरसेविका उईके, तालुक्यातील सर्व आजी- माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिकेतील नगरसेवक, भारतीय जनता पक्षाचे विविध आघाडीचे पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख,बूथ प्रमुख, आणि सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने स्वातंत्रवीरांचा गौरव यात्रे सहभागी झाले होते.

(The gadvishva) (the gdv) (kurkheda) (sawarkar gourav yatra)