कुरखेडा येथील मुनघाटे महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत

162

The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, ६ एप्रिल : गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीची सत्र २०२१ – २०२२ ची गुणवत्ता यादी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. यात दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्था गडचिरोलीद्वारा संचालित स्थानिक श्री गोविंदराव मुनघाटे कला व विज्ञान महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी गुणवत्ता यादीत आपले स्थाननिश्चित करून दरवर्षीची अखंड परंपरा कायम ठेवली.
पदव्युत्तर मराठी विभागाचे शैलेश सिताराम गायकवाड हा द्वितीय मेरिट अक्षय भास्कर काळबांडे हा तृतीय मेरिट तर बीएससी च्या परीक्षेत लोकेश श्रीराम हलामी हा विद्यार्थी विद्यापीठाच्या अनुसूचित जमाती विभागातून पहिला आला. हे विद्यार्थी आपल्या यशाची श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, मराठीपदव्युत्तर विभागाचे प्रोफेसर डॉ. नरेंद्र आरेकर व विज्ञान विभागाचे सर्व प्राध्यापक यांना दिलेले आहेत. लोकेश श्रीराम हलामी हा विद्यार्थी रातुम नागपूर विद्यापीठात एम. एस. सी. (टेक) जिओलॉजी ला प्रवेश घेतलेला आहे. यापूर्वी या महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी गोंडवाना विद्यापीठाच्या सुवर्णपदकाचे मानकरी ठरले असून गुणवत्ता यादीत नैपुण्य प्राप्त केलेले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन दंडकारण्य संस्थेचे अध्यक्ष तथा प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे, संपूर्ण कार्यकारी मंडळ, स्थानिक व्यवस्थापन मंडळ सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादींनी केलेले आहे.

(The gadvishva) (the gdv) (kurkheda gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here